Nashik: ग्रामपंचायतींना मागणी करूनही कामे ठेकेदारांना! कामांसाठी पेठ तालुक्यातील सरपंचांची जिल्हा परिषदेवर धडक

ग्राम विकास योजनेंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात मंजूर झालेली कामे पेठ तालुक्यातील ग्रामपंचायतींनी मागणी केलेली असताना त्यांना न देता ती तालुक्याबाहेरील ठेकेदारांना दिली जात आहेत.
A delegation of sarpanchs from Peth taluka giving a statement to Zilla Parishad Executive Engineer Sandeep Sonawane on Wednesday.
A delegation of sarpanchs from Peth taluka giving a statement to Zilla Parishad Executive Engineer Sandeep Sonawane on Wednesday.esakal

Nashik : आदिवासी समाजाच्या विकासासाठी आदि आदर्श ग्राम विकास योजनेंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात मंजूर झालेली कामे पेठ तालुक्यातील ग्रामपंचायतींनी मागणी केलेली असताना त्यांना न देता ती तालुक्याबाहेरील ठेकेदारांना दिली जात आहेत.

या विरोधात आक्रमक झालेल्या तालुक्यातील सरपंचांनी जिल्हा परिषदेवर धडक देत ही कामे ग्रामपंचायतींना मिळावी, अशी मागणी केली. (Sarpanch of Peth taluka strike at Zilla Parishad for work nashik news)

भाजप विधानसभा संपर्कप्रमुख संजय वाघ, श्याम गावित, सभापती विलास अलबाड, उपसभापती तुळशीराम वाघमारे, सरपंच किरण भुसारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बांधकाम कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अर्जुन गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेतली.

पेठ तालुका हा १०० टक्के आदिवासी बहुल तालुका असून, तालुक्यातील सर्व गाव, पाडे, वाडे, वस्त्या आहेत. सदर लोकांच्या विकासाकरिता प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे. सदर योजनेत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती व गावांचा समावेश केला आहे.

या योजनेंतर्गत या गावांमध्ये ९० हून अधिक सुमारे नऊ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. ही कामे गुणवतापूर्ण व दर्जेदार व्हावी, यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींना मिळावी, अशी मागणी आहे. बहुतेक कामे ही १६ लाखांच्या मर्यादेच्या रकमेची असल्याने संबंधित कामे ग्रामपंचायत स्तरावर देण्यात यावी, अशी मागणी काही ग्रामपंचायतींनी केली देखील आहे.

A delegation of sarpanchs from Peth taluka giving a statement to Zilla Parishad Executive Engineer Sandeep Sonawane on Wednesday.
Nashik News : ग्रामपालिका आरक्षणाने प्रस्थापितांना धक्का! घोटीत काही ठिकाणी खुशी, काही ठिकाणी गम

याबाबत सरपंच/उपसरपंच यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला कामे मिळण्याबाबत पाठपुरावा केला. परंतु संबंधित विभागाकडून स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच यांना प्रशासनाकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहेत. प्रशासन कोणत्याही प्रकारची दाद देत नाही. सदरची ही कामे ग्रामपंचायतींनी मागणी करून त्यांना न देता ती ठेकेदारांना दिली जात आहेत.

योजनेची कामे ज्या ग्रामपंचायतींनी कामांची मागणी केली आहे त्या ग्रामपंचायतींना प्राधान्य क्रमाने मिळावी. स्थानिक स्वराज्य संस्था यांचे अधिकार डावलून ही कामे इतरचे एजन्सी अथवा ठेकेदार यांना देण्यात येऊ नये, अशी मागणी सरपंचांच्या शिष्टमंडळाने केली.

अन्यथा पेठ तालुक्यातील सरपंच, लोकप्रतिनिधी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा या वेळी देण्यात आला. या वेळी सरपंच मनोहर चौधरी, मोहन कामडी, ललित चौधरी, कौशल्या भुसारे, विलास दरोडे, अशोक मुकणे, नामदेव वाघेरे, संजय फुफाने, राजेंद्र गवळी आदींसह तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.

A delegation of sarpanchs from Peth taluka giving a statement to Zilla Parishad Executive Engineer Sandeep Sonawane on Wednesday.
Nashik News : हरणबारी उजव्या कालव्यासाठी 33. 50 कोटी मंजूर! शासनाची अंतिम प्रशासकीय मान्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com