Satana Fuel Crisis: सटाणा-बागलाणमध्ये पेट्रोल-डिझेल टंचाई तीव्र; निवडणुकांनंतर दरवाढीच्या शक्यतेने पुरवठा विस्कळीत, पंपांवर लांबच लांब रांगा

सटाणा व बागलाणमध्ये पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा; पंप बंद, उपलब्ध पंपांवर लांबच लांब रांगा, शेतीकामे व लग्नसराईची वाहतूक ठप्प
Fuel Crisis Hits Satana: Supply Cuts Lead to Dry Petrol Pumps Across Baglan

Fuel Crisis Hits Satana: Supply Cuts Lead to Dry Petrol Pumps Across Baglan

Sakal

Updated on

सटाणा : शहर आणि बागलाण तालुक्यात सिलिंडरच्या तुटवड्यानंतर आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. शहरातील देवळा रस्त्यावरील रिलायन्स पंपासह तालुक्यातील काही प्रमुख पेट्रोल पंप इंधन उपलब्ध नसल्याने बंद आहेत. तर ज्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे, तिथे भर उन्हात वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता इंधन दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर इंधन कंपन्यांकडून होणारा पुरवठा विस्कळीत झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, आगाऊ पैसे भरूनही मनमाड येथील पानेवाडी प्रकल्पातूनच इंधन पुरवठा बंद असल्याचे काही पेट्रोलपंप चालकांनी सांगितले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com