Satish Khare Bribe Case : सहकार विभागात रंगू लागल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लीला!

Satish Khare arrested
Satish Khare arrestedesakal

Satish Khare Bribe Case : जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याला तीस लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर खरे व त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लीलांच्या खुमासदार चर्चा सहकार विभागात रंगू लागल्या आहेत.

त्यातील एक चर्चा म्हणजे सातव्या वेतन आयोगाचा फरक देताना झालेली ९३ लाखांची वसुली चर्चेत आली आहे. (Satish Khare Bribe Case Senior officials gossip in cooperation department nashik news)

गेला अनेक वर्षांपासून नाशिकचा जिल्हा उपनिबंधक कार्यालय विविध कारणांनी चर्चेत आहे. त्यातले सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे येथे चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले आर्थिक व्यवहार हे आहेत.

सहकार विभागात काही महिन्यांपूर्वी लाचलुचपत विभागाने कर्मचाऱ्यांना अटक केल्यानंतर या विभागातील आर्थिक लुटीचे प्रकार थांबतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र उलट त्याच्या कित्येक पट आर्थिक गैरव्यवहार वाढल्याचे दिसून आले.

सहकारी बँकेच्या संचालकांवर चुकीची कारवाई करणे, माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून संबंधित सहकारी संस्थेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी साटे-लोटे करून कारवाई थांबविणे, ओझर व त्र्यंबकेश्वर येथील सहकारी संस्थांतील आर्थिक गैरव्यवहार उघड होऊनही कारवाई न होणे अशा एक ना अनेक प्रकार या विभागात राजरोसपणे चालले.

सहकार विभागातील कप्पा अन कप्पा आर्थिक गैरव्यवहारांनी बरबटलेला आहे. यात विभागीय, जिल्हा व तालुका अशा तिन्ही स्तरांवर आर्थिक गैरव्यवहार करण्याची स्पर्धा अधिकाऱ्यांमध्ये लागल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले. त्याची परिणिती मोठा मासा गळाला लागण्यात झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Satish Khare arrested
Nashik Bribe Crime: लाचखोरांनी गाठली 4 महिन्यात शंभरी! ACB अधीक्षक वालावलकर लाचखोरांसाठी कर्दनकाळ

९३ लाखांची वसुली चर्चेत

सहाव्या वेतन आयोगाचा फरक अदा करण्यासाठी व सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी तालुका उपनिबंधक कार्यालय, जिल्हा उपनिबंधक व तालुका निबंधक कार्यालय असा तीन स्तरावर डीलिंग झाल्याच्या चर्चा सहकार विभागात सुरू आहे.

जवळपास ९३ लाखांची वसुली फरकाची रक्कम अदा करण्यासाठी झाल्याचे बोलले जात आहे. तालुका जिल्हा व विभाग अशा पातळीवर झालेल्या वसुलीमुळे सहकार विभाग चर्चेत आला आहे.

Satish Khare arrested
Nashik News : खरेंच्या अटकेनंतर जिल्हा उपनिबंधकपदाचा पदभार एस. वाय. पुरी यांच्याकडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com