Satish Khare Bribe Case : सतीश खरेंची मध्यवर्ती कारागृहात रवानगी

Nashik Road Central jail
Nashik Road Central jailesakal

Nashik News : बाजार समिती निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांविरोधातील सुनावणीत बाजूने निकाल देण्यासाठी तब्बल ३० लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेला जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याची नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. (Satish Khare sent to Central Jail bribe crime nashik news)

खरे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी (ता. २०) त्यास पुन्हा न्यायालयात आणले असता, त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.

जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यास सोमवारी (ता. १५) रात्री त्याच्या कॉलेज रोडवरील राहत्या घरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. खरे याच्या अटकेमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात लाचखोर खरे याच्या घरातून रोकड व सोने असे घबाड हाती लागले.

या शिवाय मालमत्तेच्या कागदपत्रांसह आक्षेपार्ह कागदपत्रेही सापडली आहेत. दरम्यान, खरे याच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यास शनिवारी (ता. २०) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे खरे याची नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली.

पथकांकडून तपास

खरे यांच्या पोलिस कोठडीदरम्यान तपासासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुमारे पाच पथके नेमण्यात आली होती. यातील तीन पथके अजूनही सटाणा आणि इगतपुरीत लाचखोर खरे याच्या मालमत्तेचा शोध घेत आहेत.

Nashik Road Central jail
Nashik Bribe Crime : डॉ. वैशाली पाटीलकडे मिळाले 81 तोळे सोने

खरे याच्या मालमत्तेसंदर्भात कागदपत्रे तपास पथकांच्या हाती लागली असून, त्यानुसार ही पथके शोध घेत आहेत. या आधारे खरे याच्याविरोधात चौकशीअंती अपसंपदेचाही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

असाही ट्विस्ट : नाही टळले कारागृहात जाणे

लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यास न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले असता ते थेट आयसीयू गेले. तेथून त्यांना आपत्कालीन विभागात आणण्यात आले.

या ठिकाणी ते बेडवर झोपले. त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या लाचखोर वैशाली पाटील यादेखील त्याच विभागात आल्या. दोघांनी जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचे बोलले जाते. यासाठी त्यांच्यासोबत इतर ओळखीच्या लोकांनी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याची चर्चा होती.

परंतु बराच वेळ थांबल्यानंतर त्यांना दाखल करण्याऐवजी कारागृहात सोडण्याचाच निर्णय घेण्यात आला. अखेरीस पोलिस वाहनातून त्यांना नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहाकडे जावे लागले. दरम्यान त्यांच्या अवतीभवती असलेल्या खासगी व्यक्तींचा गराडा मात्र चर्चेचा विषय ठरला होता.

Nashik Road Central jail
Bribe : वाळूवाल्यांकडून हप्त घेताना अटक; आता तहसीलदारासह हस्तकाची पोलीस कोठडीत रवानगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com