सत्यशोधक विवाह चर्चेत; मामांकडून भाचीसाठी अनोखे कन्यादान

Wedding Couple
Wedding Coupleesakal

जुनी शेमळी (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथील खुशी क्लासेसचे संचालक प्रशांत बच्छाव व नरेंद्र बच्छाव या दोघा भावांनी आपल्या भाचीचा विवाह सोहळा (Wedding Ceremony) सत्यशोधक पद्धतीने (Satyashodhak) करून तालुक्यात एक नवीन पायंडा पाडला आहे. या अनोख्या विवाहाची परिसरात चर्चा झाली नाही तरच नवल. (satyashodhak marriage took place in juni Shemli Nashik News)

या विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च मुलीच्या मामांनी केला. प्रत्येक आई- वडिलां आपल्या मुलीचा विवाह सोहळा परिस्थितीमुळे धुमधडाक्यात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करता येत नाही. परंतु, धावपळीच्या युगात प्रशांत व नरेंद्र या दोघा भावंडांनी आपल्या भाचीचा लहानपणापासून शैक्षणिक खर्च व विवाह सोहळा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. विशेष म्हणजे सत्यशोधक पद्धतीचा अवलंब करून विवाहाप्रसंगी कुठलेही अन्नधान्य वाया जाऊ नये म्हणून वधू- वरांवर अक्षतांऐवजी फुले टाकण्यात आली. या विवाह सोहळ्यात कुठल्याही प्रकारचा आहेर घेतला नाही. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे वधू- वरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

सत्यशोधक विवाह पार पडल्याचे प्रमाणपत्रही वधु- वरांना देण्यात आले. या सत्यशोधक विवाह सोहळ्याचे प्रास्ताविक भगवान रोकडे यांनी केले. प्रशांत बच्छाव, नरेंद्र बच्छाव यांनी आभार मानले.

Wedding Couple
Nashik : उन्हामुळे डाळिंबाला कही खूशी कही गम

"माझ्या मामाची इच्छा होती की माझा विवाह सोहळा सत्यशोधक पद्धतीने व्हावा. सत्यशोधक विवाह सोहळ्यामुळे अतिरिक्त खर्च कमी झाला. विवाह सोहळ्याप्रसंगी धान्याची नासाडी न करता फुलांचा अक्षदा म्हणून वापर केल्यामुळे मला मनस्वी आनंद झाला."

- खुशी गायकवाड, नववधू, जुनी शेमळी

"सत्यशोधक पद्धतीचा विवाह सोहळा बागलाण तालुक्यात प्रथमच झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्सुकता होती. येणाऱ्या काळात प्रत्येकाने असा विवाह सोहळा केल्यास खर्चाला आळा बसेल. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रसार होईल. यानिमित्ताने वृक्षारोपणाची मदत होईल." - गोकुळ गांगुर्डे, ग्रामस्थ, जुनी शेमळी

Wedding Couple
नाशिक : भरधाव कंटेनरने पोल, झाडे तोडली; 2 मुले बचावली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com