School Trips : शालेय सहलीला ग्रीन सिग्नल मिळताच धामधूम; विद्यार्थ्यांसह शिक्षक पर्यटनासाठी आतुर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School Trips

School Trips : शालेय सहलीला ग्रीन सिग्नल मिळताच धामधूम; विद्यार्थ्यांसह शिक्षक पर्यटनासाठी आतुर

येवला : ज्ञानवृद्धी, पर्यटन आणि भौगोलिक व शैक्षणिक स्थळे पाहण्यासाठी निघणाऱ्या शैक्षणिक सहलींना कोरोनाच्या दोन वर्षाच्या ब्रेकनंतर शिक्षण खात्याने ग्रीन सिग्नल दिला आहे. या परवानगीनंतर विद्यार्थ्यांसह शिक्षक पर्यटनासाठी आतुर झाले असून सर्वत्र सहलींची धामधूम सुरू झाली आहे. अनेक शाळा या महिन्यात विविध पर्यटन व धार्मिकस्थळी सहलीला जात असून सध्या मंजुरीची प्रक्रिया गतिमान वेगाने सुरू आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच, परिसर ज्ञान प्राप्त व्हावे, निसर्ग, पर्यावरण, ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक, भौगोलिक माहिती व्हावी, विद्यार्थ्यांना गड किल्ले पाहता यावेत. इतिहास, भूगोल कळावा. यासाठी शाळांकडून शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येते. आता थंडीची चाहूल लागताच शाळांना सहलीचे वेध लागले असून शालेय शिक्षण विभागानेही सहलीचे आयोजन करण्यास हिरवा कंदील दिला आहे. कोरोनामुळे दोन वर्ष विद्यार्थी सहलीला मुकले होते. मागील वर्षी ऑफलाइन शाळा सुरू झाल्या पण आता कुठलेही विघ्न नसल्याने शिक्षण विभागाने शाळांना सहलीची परवानगी दिली आहे.

हेही वाचा: Javed Jaffery: वयाची साठी गाठणारा जावेद जाफरी अजूनही फिट कसा? जाणून घ्या फिटनेस सीक्रेट

त्यामुळे शाळा जोमाने सहलीसाठीची तयारी करीत आहे. गेल्या आठ दिवसात शालेय सहलीचे नियोजन गतिमान झाल्याने शिक्षण विभागाच्या परवानग्या व बसचे बुकिंग सुरु आहे. प्राथमिक विभागाचे मुले लहान असल्याने एक दिवसांची तर माध्यमिक विभाग मात्र दोन ते तीन दिवसांची सहल काढत आहेत.

परवानगीचे शुक्लकाष्ठ

शाळांना विविध प्रकारचे २२ प्रकारची कागदपत्रे सादर केल्यानंतर आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सहलीला परवानगी देण्यात येते. परिवहन महामंडळही याशिवाय बस उपलब्ध करून देत नाही. अटींची पूर्तता आणि हमी घेतल्यानंतर सहलीला परवानगी देण्यात येते. त्यामुळे ही सर्व कागदपत्र जमविताना गुरुजींची एकच धावपळ होताना दिसत आहे.

या स्थळांना पसंती

शाळांकडून पर्यटनासाठी त्रंबकेश्वर, वेरूळ, कोल्हापूर, अजिंठा, औरंगाबाद, पुणे परिसरातील अष्टविनायक, प्रतिबालाजी, स्टॅच्यू ऑफ युनिटी, गणपतीपुळे, शिवनेरी, रायगड, हरिहरेश्वर, कर्जत, फिल्मसिटी, दिवे आगार, पाली अशा लोकप्रिय स्थळांना पसंती दिली जात आहे.

हेही वाचा: Numerology : तुमच्या जन्म वर्षाचा शेवटचा आकडा सांगेल तुमचा स्वभाव

“मागील पंधरा दिवसापासून सहलीसाठी अनेक शाळांकडून बससाठी विचारणा होतेय. नैमित्तिक करारावर आम्ही बस उपलब्ध करून देत असून यासाठी विविध परवानगीस कागदपत्रांची पूर्ततेनंतर बस दिल्या जातात. एस.टी.च्या नियमाने सवलतीत बस दिल्या जातात. एका बसमध्ये ४० विद्यार्थी व ४ शिक्षकांना परवानगी आहे.”

- सागर आचारी, सहल विभाग प्रमुख, येवला आगार

“तालुक्यातील प्राथमिक-माध्यमिक शाळाही एक ते चार दिवसापर्यंतच्या सहली विविध पर्यटनस्थळी नेत असून यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता व हमीपत्र दिल्यानंतर शिक्षण विभागाकडून शाळांना परवानगी दिली जात आहे. यावर्षी सहलींना मोठा प्रतिसाद आहे.”

-सुनील मारवाडी, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, येवला

हेही वाचा: How To Meditate : मेडिटेशनपूर्वी करा अशी तयारी; मिळेल बेस्ट Experience

“गेल्या दोन ते चार वर्षापासून शाळांच्या सहली गेलेल्या नाही. यामुळे विद्यार्थी अतिउत्साही असून पालकांचा प्रतिसाद देखील चांगला आहे. सहलीमुळे दररोजच्या अभ्यासाबरोबर विरंगुळा होतोच पण अभ्यासातील स्थळे पाहता येतात.

- अण्णासाहेब काटे, मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय, तांदूळवाड

टॅग्स :Nashikschooltrip