महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर कोरोना बॅचचा डाग..अनेक महाविद्यालयांकडून चूक उघडकीस

college stuents.jpg
college stuents.jpg
Updated on

नाशिक : राज्यातील शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसार अकरावीच्या विद्यार्थ्यांना पास केले गेले. मात्र नाशिकमधल्या काही कॉलेजने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर असा काही शेरा मारलाय, की आयुष्यभर विद्यार्थ्यांना तो वागवावा लागणार होता. मात्र, या संदर्भात ‘सकाळ- साम’ने वृत्त देताच महाविद्यालयांनी केलेली अक्षम्य चूक दुरुस्त करीत विद्यार्थ्यांना नव्याने गुणपत्रक मंगळवारी (ता. १४) दिले. 

नाशिकमधील अनेक महाविद्यालयांकडून चूक; वृत्तानंतर तातडीचा बदल 

शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना पास करण्याचे आदेश दिलेत. तरीही शहरातील काही महाविद्यालयांनी आगळीक करत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर promoted only due to covid 19 circumstances असा कोरोना बॅचचा शिक्का मारला. शिक्का बघून विद्यार्थी चिंताग्रस्त झाले. त्यांनी ही बाब आपल्या पालकांना सांगितली. पालक व छात्र भारती विद्यार्थी संघटना याबाबत आक्रमक झाली. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावरील कोरोना बॅचचा शिक्का पुसून टाकावा आणि संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली.

याचे वृत्त ‘साम’ने देताच त्याची दखल विभागीय शिक्षण उपसंचालक प्रवीण पाटील यांनी संबंधित महाविद्यालयाविरोधात कारवाईच्या सूचना करीत चौकशीचे आदेश देत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावरून कोरोना बॅचचा शिक्का काढण्याचे आदेश दिले. संबंधित महाविद्यालयांनी मंगळवारी (ता. १४) आपली चूक दुरुस्त करीत नवीन गुणपत्रक विद्यार्थ्यांना दिले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Harshada Patil
Marathi News Esakal
www.esakal.com