esakal | BREAKING : एनडीएसटीच्या सचिवासह संचालकांनी पळविले प्रोसेडिंग..कारवाईकडे समस्त शिक्षण विभागाचे लक्ष..
sakal

बोलून बातमी शोधा

money fraud.jpg

यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे तर, इतक्‍या दिवस सोसायटीच्या संचालकांच्या मनमानी कारभाराकडे कानाडोळा करणाऱ्या जिल्हा उपनिंबधक कार्यालयाकडून संचालकांवर होणाऱ्या कारवाईकडे समस्त शिक्षण विभागाचे लक्ष लागून आहे.

BREAKING : एनडीएसटीच्या सचिवासह संचालकांनी पळविले प्रोसेडिंग..कारवाईकडे समस्त शिक्षण विभागाचे लक्ष..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील नामांकित नाशिक डिस्ट्रिक्‍ट सेकेंडरी टिचर्स ऍण्ड नॉन टिचिंक एम्प्लॉई सोसायटीच्या दोन संचालकांनी सोसायटीतील कपाट चावीने उघडून प्रोसेडिंग (इतिवृत्त) पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. लाचलुचपत विभागाने गेल्या महिन्यात सोसायटीचे व्यवस्थापक व शाखा व्यवस्थापकाला लाचप्रकरणी अटक केली तर बुधवारी (ता.1) सोसायटीचे चेअरमन रामराव बनकर यांनाही लाचप्रकरणात सहभागी असल्याच्या कारणास्तव अटक करण्यात आली.

चेअरमन रामराव बनकर यांना पोलिस कोठडी 

यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे तर, इतक्‍या दिवस सोसायटीच्या संचालकांच्या मनमानी कारभाराकडे कानाडोळा करणाऱ्या जिल्हा उपनिंबधक कार्यालयाकडून संचालकांवर होणाऱ्या कारवाईकडे समस्त शिक्षण विभागाचे लक्ष लागून आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या महिन्यात शाखा व्यवस्थापक शरद जाधव व व्यवस्थापक जयप्रकाश कुवर या दोघांना 19 हजार 715 रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. तर या लाचप्रकरणात थेट सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने बुधवारी (ता.1) सोसायटीचे चेअरमन रामराव बनकर यांनाही अटक केली. यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. सोसायटीच्या संचालकांविरोधात सभासद शिक्षकांनी कारवाई करण्याची मागणी जिल्हा उपनिंबधक कार्यालयाकडे केली असून, त्यानुसार चौकशी करण्याचे सुतोवाच केले आहे. 

कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
दरम्यान, गुरुवारी (ता. 2) सोसायटीचे सेक्रेटरी जिभाऊ शिंदे, बाळासाहेब ढोबळे हे तिघे सोसायटीत गेले. त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे गेल्या काही बैठकीमधील इतिवृत्ताची माहिती मागविली असता, त्यांनी देण्यास नकार दिला. त्यावेळी संबंधितांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. आणि कपाटाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील गेल्या काही बैठकीचे इतिवृत्त घेऊन पोबारा केला आहे. सोसायटीच्या सेक्रेटरीसह संचालकांनी केलेल्या या दमदाटीमुळे सोसायटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 

हेही पाहा> VIDEO : मुलाच्या विवाहाचा आनंद..अन् विधानसभा उपाध्यक्षांच्या नृत्याची झलक..एकदा बघाच!

उपनिबंधकाच्या कारवाईकडे लक्ष्य 
संचालक मंडळाच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी सभासदांनी केली असून तसे लेखी निवेदन उपनिबंधकांना देण्यात आलेले आहे. त्यानुसार चौकशी करण्याचे सुतोवाचही करण्यात आलेले आहे. असे असतानाही सोसायटीचे सेक्रेटरी व दोन संचालकांनी कार्यालयात येऊन इतिवृत्तच पळवून नेण्याच्या घटनेसंदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडून होणाऱ्या कारवाईकडे जिल्ह्यातील शिक्षक सभासदांचे लक्ष्य आहे. की, उपनिबंधक कार्यालय संचालकांच्या मनमानी कारभाराला छुपा पाठबळ देतेय का, अशीही चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. 

हेही वाचा > "बा विठुराया..! चक्क निवृत्तीनाथ महाराजांनाही नाही सोडले.." एसटी महामंडळाचा चिंधीचोरपणा चव्हाट्यावर

loading image
go to top