Nashik Crime : शहरात गजबजलेल्या लोढा मार्केट व्यापारी संकुलात भरदिवसा साडेसात लाखाची चाेरी

शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या मोसम पुल चौकातील लोढा मार्केट व्यापारी संकुलात भरदिवसा साडेसात लाखाची चाेरी झाल्याने खळबळ उडाली आहे.
Thieves caught on CCTV in case of theft of seven and a half lakhs in Lodha Market trading complex
Thieves caught on CCTV in case of theft of seven and a half lakhs in Lodha Market trading complexesakal

मालेगाव : शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या मोसम पुल चौकातील लोढा मार्केट व्यापारी संकुलात भरदिवसा साडेसात लाखाची चाेरी झाल्याने खळबळ उडाली आहे.

व्यापारी संकुलातील रेडीमेड कपड्यांच्या दुकानात खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या दुचाकीच्या डिक्कीतून दोघा चोरट्यांनी सफाईदारपणे ७ लाख ८० हजार रुपये लंपास केले. दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

शुक्रवारी (ता. २) सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान छावणी पोलिसांसमोर आहे. (Seven half lakh stolen during day in crowded Lodha Market commercial complex in city Nashik Crime)

शहर व परिसरात गेल्या काही दिवसात चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. शेखर देवराम पवार (वय २८, रा. तळवाडे, ता. मालेगाव) हा तरुण मका व शेतमाल विक्रीतून बँकेत आलेले पैसे काढण्यासाठी आला होता.

शेखरने ॲक्सीस बँकेतून ७ लाख ८० हजार रुपये काढले. हे पैसे डिक्कीत ठेवले. बँकेतून शेखर कामानिमित्त सोयगाव नववसाहत भागात गेला. तेथून तो लोढा मार्केट व्यापारी संकुलातील किर्ती ड्रेसेसमध्ये मुलांचे कपडे खरेदीसाठी आला.

या दुकानासमोर दुचाकी लावली असतांना तो दुकानात असल्याची संधी साधून दोघा चोरट्यांनी दुचाकीजवळ पाच मिनिट घुटमळत सफाईदार दुचाकीची डिक्की खोलून ही रक्कम लंपास केली.

Thieves caught on CCTV in case of theft of seven and a half lakhs in Lodha Market trading complex
Nashik Crime : फर्नांडिसवाडीत गँगवॉरचा भडका! गोळीबार प्रकरणातील संशयिताला कोठडी

काही वेळानंतर हा प्रकार त्याच्या लक्षात आला. घटनेनंतर शेखर बँकेसह जेथे जेथे गेला तेथे रक्कम शोधत फिरला. मात्र त्याला काही हाती लागले नाही. अखेर त्याने छावणी पोलिस स्टेशन गाठून रात्री पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

छावणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर घटनास्थळी भेट दिली. रस्त्यावरील व लोढा मार्केटमधील सीसीटीव्ही फुटेज खंगाळले.

यात मार्केटमधील सीसीटीव्हीत हे चोरटे कैद झाले आहेत. एका चोरट्याने चेहऱ्यावर मास्क परिधान केले आहे. दुसरा पाठमोरा दिसत आहे. दोघे तरुण असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Thieves caught on CCTV in case of theft of seven and a half lakhs in Lodha Market trading complex
Nashik Crime : प्राणघातक हल्ल्यातील दोघा संशयितांना अटक; शहरातून पसार होताना गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com