'आदिवासी हा देशाचा मूळ मालक, तो नक्षली विचार करणार नाही' - शरद पवार | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

'आदिवासी हा देशाचा मूळ मालक, तो नक्षली विचार करणार नाही'

घोटी (जि. नाशिक) : देशाचा सन्मान राखण्याबरोबरच  ज्यांनी देश एकसंध करण्यासाठी संघर्ष केला त्यांचा अभिमान ठेवण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकांत आपल्याला देशाभिमान उभा करावा लागेल. जो आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे, त्याची अवस्था आज बिकट झाली आहे. त्यांचे परिवर्तन घडवून आणावे, यासाठी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांचा इतिहास त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी भव्यदिव्य असे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारक उभे करावयाचे आहे. ज्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण करण्यासाठी बाडगीच्या माचीचा व राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्या क्रांतीचा सन्मान होत आहे याबद्दल मला आंनद होत आहे. आशा गौरवशाली परंपरेचा आपण सन्मान करणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. 

ते सोनोशी ( ता. इगतपुरी ) येथे रविवार ( ता. १४ ) रोजी आदिवासी क्रांतिकारक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, पद्मभूषण राहीबाई पोपरे, पालकमंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, किरण लहामटे, नितीन पवार, सुनील भुसारा, दौलत दरोडा, अशोक भांगरे, माजी आमदार शिवराम झोले, निर्मला गावित,शिवेसना उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, कार्यध्यक्ष कोंडाजी आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे,तहसीलदार परमेश्वर कासुळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक : उड्डाणपुलावर उभ्या कंटेनरला कारची धडक; एक ठार

पवारांना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित आदिवासी बांधवांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते, या कार्यक्रमांना पवार यांनी मनसोक्त आनंद लुटत आदिवासी युवकांना रोख रक्कम देत सन्मान केला.

पुढे बोलतांना पवार म्हणाले की, सामाजिक न्याय व परिवर्तनासाठी संघर्ष केला पाहिजे मात्र ज्यांनी नक्षली विचार हातात घेतला त्यांनी आदिवासींवर देखील अत्याचार केले. खरा आदिवासी हा सर्वांच्या हिताचा विचार करत तो कोणावरही अन्याय करणार नाही. देशाचे प्रथम नागरिक म्हणून त्यांचा सन्मान त्यांचे अधिकार त्यांना देने गरजेचे आहे. इथल्या जंगल, पर्यावरणाचे जतन-रक्षणासाठी आदिवासी बांधव झगडत आहे. खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नक्षली ठरवणे चुकीचे आहे. आदिवासी कधीही नक्षलीअसू शकत नाही. नुकतेच महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलीवर कारवाही करत मारले, तरुण पिढीला भरकाटवून संपूर्ण आदिवासी समाज उध्वस्त होईल. म्हणून नक्षली विचार आदिवासींच्या हिताचे नाही त्यांना विरोध करण्याची भूमिका आपल्या सर्वांना घ्यावी लागेल. स्वतः नक्षली भागाचा दौरा करून त्यांच्या अडीअडचणी, दुःख समजून घेणार आहे. राज्य सरकारच्या वतीने काही आवश्यकता असेल त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रावर हल्ला बोल करत आपल्या खास शैलीत टोलेबाजी करतांना जन जमिनीचे खरे मालक असतांना मध्येच काढलं हे वनवासी आहेत. त्यातच काही लोक म्हणतात १९४७ मिळालेलं स्वातंत्र्य भीक आहे, त्यांना पद्मश्री मिळतो. म्हणे खरे स्वतंत्र २०१४ मिळालं, ह्यात पेट्रोल मेंहगा, डिझेल ए ओ सब मेंहगा, गेस मेहंगा ना मै खाऊगा ना खाणे दूगा, और गेस इतना मेंहाग कर दुगा ना मै पकाने दूगा. ज्यांना देशाचा इतिहास माहिती नाही त्यांना सन्मान दिला जातोय असा प्रश्न उपस्थित करत देशाच्या स्वाभिमानाची लढाई मनामनात पेटली पाहिजे असे म्हटले.

हेही वाचा: नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ

नरहरी झिरवाळ,जितेंद्र आव्हाड आदींनी भाषणे करतांना आदिवासी बांधव एकजुटीने उभे राहून आपले हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही आपल्या सोबत राहू असे म्हटले.

बिरसा मुंडा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम बोलतांना म्हणालेकी आंतरराष्ट्रीय स्तरावर या देशात आदिवासी राहत नसल्याचे सांगितले गेलं आणि भिल हे आर्यन भाषा बोलत असून कोणावरही अन्याय होत नाही. इतके खोटा इतिहास व प्रसार, मंदिरे झालीत मात्र आदिवासी क्रांतिकारकांची स्मारके विसरले. यासाठी आम्ही आमचे केप्टन म्हणून शरदचंद्र पवार यांच्याकडे आपक्षेने पाहत आहे, तेंव्हा ते आम्हला न्याय देतील असे म्हटले. आदिवासी युवकांनी शरद पवार यांना मानवंदना देत आपले नेते मानले.

loading image
go to top