Nashik Sharad Pawar : शरद पवारांच्या दौऱ्याची नाशिकपासूनच होणार सुरवात

 Sharad Pawar News
Sharad Pawar NewsEsakal

Nashik Sharad Pawar : जिल्ह्यातील १४ आमदार शरद पवारांच्या पाठिशी अशी ओळख निर्माण करणाऱ्या नाशिकपासून आता राज्याच्या दौऱ्याची शरद पवार हे सुरवात करणार आहेत. हे झाले श्री. पवार यांच्याशी स्नेहबंध असलेले आणि राज्याच्या मंत्रिमंडळात दाखल झालेले छगन भुजबळ यांच्या भागाविषयी.

आणखी जवळचे दिलीप वळसे-पाटील यांच्या आंबेगावमध्ये आणि धनंजय मुंडे यांच्या परळीमध्ये प्रत्येकी एक दिवसभर वेळ देण्याचे श्री. शरद पवार यांनी ठरवले आहे. (Sharad Pawar tour will start from Nashik news)

मागील विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दौऱ्याला श्री. शरद पवार यांनी नाशिकपासून सुरवात केली होती. त्यामुळे नाशिकशी असलेला ‘कनेक्ट' अधिक घट्ट करण्यासाठी आताच्या राजकीय परिस्थितीत सुद्धा श्री. शरद पवार यांनी नाशिकपासून दौऱ्याची सुरवात केलेली दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याप्रमाणे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही श्री. शरद पवार हे राज्याच्या दौऱ्याची सुरवात चार ते पाच दिवसांमध्ये नाशिकपासून करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 Sharad Pawar News
Sharad Pawar In Jalgaon : अजितदादांच्या बंडानंतर पवार या तारखेला जिल्ह्यात

‘मी लढायला तयार आहे', असे सांगत असताना श्री. शरद पवार यांनी नाशिक, धुळे, जळगाव अशा दौऱ्याचे नियोजन केल्याची माहिती दिल्याचे श्री. आव्हाड यांनी स्पष्ट केले.

नाशिकसह बीड, नगर, सोलापूर, पुणे, नागपूर अशा काही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर श्री. शरद पवार हे जाणार आहेत. त्यासंबंधीची बैठक दिल्लीत होणार असल्याचे प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे. दरम्यान, श्री. भुजबळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत गेले असले, तरीही श्री. आव्हाड हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील आहेत. तसेच त्यांना मानणारा तरुण कार्यकर्त्यांचा वर्ग जिल्ह्यात आहे.

 Sharad Pawar News
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादीत 'बॉस' कोण? कोणत्या गटात कोणता नेता, आज होणार फैसला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com