Cyber Fraud
sakal
नाशिक: शेअर ट्रेडिंगचा अनुभव असतानाही जादा लाभाच्या आमिषाने निवृत्त अधिकाऱ्याने त्यांची आयुष्याची सर्व जमापुंजी असलेली सव्वादोन कोटींची रक्कम गमावली आहे. स्वत: शेअर ट्रेडिंगमधून लाभ घेतल्यानंतर ते सायबर भामट्याच्या जाळ्यात अडकले आणि जादा लाभाच्या आमिषापोटी त्यांची सव्वादोन कोटींची फसवणूक झाली. या प्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसांत सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.