Shinde Group Crisis
Shinde Group Crisisesakal

Shinde Group Crisis: शिंदे गटाच्या ‘इनकमिंगला ब्रेक’! उद्धव ठाकरे गट सुखावला

Shinde Group Crisis : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत शिंदे गटात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेला एक मोठा गट तूर्त बदलत्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर थांबला आहे.

पुढील काळात नवीन राजकीय चित्र काय निर्माण होते याची वाट पाहूनच निर्णय होईल अशी भूमिका घेण्यात आली आहे. शिंदे गटाकडचे इनकमिंग थांबल्याने उद्धव ठाकरे गट मात्र सुखावला आहे. (Shinde Group in crisis incoming money break Uddhav Thackeray group happy nmc eleciton nashik political news)

मागील वर्षाच्या जून महिन्यात महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका बसला. शिवसेनेतून चाळीस आमदारांचा गट बाहेर पडला. त्यानंतर भाजपच्या मदतीने या गटाचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले.

शिंदे यांच्याकडून शिवसेना पक्षावरच दावा करताना राज्य निवडणूक आयोगानेदेखील धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाच्या नावावर केले. त्यानंतर शिवसेना हाच मूळ पक्ष आमचा असल्याचा दावा करत राज्यभर शाखा स्थापन करण्याबरोबरच शिंदे गटात अनेकांना प्रवेश देण्यात आले.

नाशिकमध्ये सुरवातीला शिंदे गट फारसा प्रबळ नव्हता, मात्र अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांची मोठी फळी शिंदे गटात सामील झाली. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा झटका तर होताच, त्या व्यतिरिक्त शिंदे गटाची मोठी ताकद व ब्रँड निर्माण करणारी घटना होती.

माजी नगरसेवकांचा मोठा गट शिंदे गटात सहभागी झाल्याने पहिल्या दिवसापासून शिंदे यांचे समर्थन करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली व त्याचे पडसाद वादाच्या स्वरूपात उमटले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shinde Group Crisis
Sharad Pawar NCP : ‘आम्ही सारे शरद पवारांचेच सांगाती...’ हरिहरराव भोसीकर; जिल्हाध्यक्षांसह १५ तालुकाध्यक्षांचा पाठिंबा

मात्र, त्यानंतर सातत्याने शिवसेनेच्या शिंदे गटात मोठे प्रवेश झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत ज्या- ज्या वेळी नाशिकमध्ये आले. त्यांच्या परतीच्या किंवा आगमनापूर्वी मोठे प्रवेश घडवून संजय राऊत यांनादेखील आव्हान देण्यात आले.

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या स्थापनेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे आउटगोइंग तर शिंदे गटाकडे इनकमिंगचा ओघ होता. परंतु राज्यात घडलेल्या प्रमुख घडामोडींमुळे या इनकमिंगला ब्रेक लागला आहे.

भवितव्याची चिंता

राज्यामध्ये भाजप व मूळ शिवसेना आपलेच असल्याचा शिंदे गट हे दोनच पक्ष आगामी निवडणुकीत ताकदवान ठरतील, असा अंदाज शिवसेनेच्या शिंदे गटाला होता.

परंतु रविवारी राष्ट्रवादीचा मोठा गट बाहेर पडून सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटात येणाऱ्यांना भवितव्याची चिंता वाटल्याने नाशिकमधून मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातून होणारे आउटगोइंग तूर्त थांबल्याचे मानले जात आहे.

Shinde Group Crisis
Ajit Pawar : ना शरद पवार, ना अजित पवार! सरोज अहिरे नाशिकला परतल्या; कारण आलं समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com