Chhagan Bhujbal Scam : 'छगन भुजबळ यांनी कोट्यावधींचा घोटाळा केला'; शिंदे गटातील आमदाराचा गंभीर आरोप, अडिच लाख माथाडी कामगारांच्या रोजगारावर परिणाम

Suhas Knade Chhagan Bhujabal : महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटातील आमदाराने छगन भुजबळ यांच्यावर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप करत अडीच लाख माथाडी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला आहे.
Chhagan Bhujbal Scam allegation suhas kande

Chhagan Bhujbal Scam allegation suhas kande

esakal

Updated on

Chhagan Bhujbal Scam Allegation : राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी काढलेल्या सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून निविदा प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, अशी मागणी त्यांनी विधान भवनातील पायऱ्यांवर आंदोलन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com