
Shiv Jayanti 2023 : विश्वविक्रमी 21 फुटी कवड्यांची माळेचे डॉ. शितल मालुसरे यांच्या हस्ते अनावरण
जुने नाशिक : छत्रपती सेनेतर्फे शिवाजी महाराज परिधान करत असलेल्या कवड्यांच्या माळेची २१ फुटी प्रतिकत्मक माळ तयार करण्यात आली आहे.
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ.शितल मालुसरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. (Shiv Jayanti 2023 World record 21 feet kawadyanchi maal made by chhatrapati sena Unveiled by Dr Shital Malusare nashik news)

नाशिककरांच्या दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची कवड्यांची माळ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची भावी पिढीस माहिती व्हावी. त्यांचे पराक्रम आणि त्यांच्या वस्तूंचे महत्त्व याबाबत सर्व दूर माहिती पोहोचवावी.
या उद्देशाने शहरातील छत्रपती सेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिवजयंतीचे औचित्य साधत दरवर्षी महाराजांनी वापर केलेल्या भव्य दिव्य वस्तूची प्रतिकृती तयार करून त्यांचा विश्वविक्रम करण्याचा उपक्रम २०१९ पासून सुरुवात करण्यात आला आहे.
गेल्या चार वर्षात त्यांच्याकडून पाच वस्तू तयार करण्यात आल्या आहे. त्यांची विश्वविक्रमात नोंद झाली आहे. यावर्षी त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज परिधान करत असलेली कवड्यांच्या माळीची २१ फुटी विश्वविक्रमी प्रतिकृती तयार केली आहे.
डॉ. शितल मालुसरे, मविप्र संस्थेचे सरचिटणीस एड.नितीन ठाकरे तसेच कृषी उद्योग क्षेत्रातील नामवंत विलास शिंदे यांच्या हस्ते विश्वविक्रमी माळेचे अनावरण शुक्रवार (ता.१७) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास करण्यात आले. माळ नागरिकांना दर्शनासाठी खुली करून देण्यात आली.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
दरम्यान मविप्र संस्थेचे सरचिटणीस एड.नितीन ठाकरे तसेच कृषी उद्योग क्षेत्रातील नामवंत विलास शिंदे यांना डॉ. शितल मालुसरे यांच्या हस्ते शिवसमृद्धी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडन अमी छेडा, सेनेचे कार्याध्यक्ष निलेश शेलार, तुषार गवळी डॉ. जयंद्र थविल, राजेश पवार, डॉ. शाम थविल, प्रवीण भामरे, धीरज खोळंबे, राहुल ठाकरे, संदीप निगळ, कुणाल शेलार, गणेश शेलार, अविनाश पाटील, रावसाहेब शिंदे, मुकेश पाटील, ऍड. विद्या चव्हाण, पूजा खरे, प्रिया कुमावत आदी उपस्थित होते.
माळेचे वैशिष्ट्य
कवड्यांची माळ
२१ फुटी माळ
६४ कवड्यांचा वापर
१.२५ फूट कवडी
७१ किलो वजन
९० फूट १० कोलो दोरीचा वापर
६१ किलो फायबरचा वापर
लॅकर कोटिंग कवडी
रंगकाम नाशिकमध्ये
अहमदाबाद गुजरात येथे कवडी तयार केली
सहा कारागीर
दोन महिन्याचा कालावधी
छत्रपती शिवरायांची खऱ्या माळीचे आकर्षण
छत्रपती शिवाजी महाराज परिधान करत असलेले कवड्यांची माळ त्यांनी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना प्रदान केली होती. तेव्हापासून ती माळ मालुसरे कुटुंबीयांकडे अजूनही सुस्थितीत जतन करून ठेवण्यात आली आहे.
अशी ही माळ विश्वविक्रमी माळ्याच्या अनावर प्रसंगी तानाजी मालुसरे यांचे वंशज डॉ. शितल मालुसरे यांनी नाशिककराना दर्शवण्यासाठी शिवस्मारक येथे उपलब्ध करून दिली. महाराजांच्या प्रत्यक्ष माळीचे दर्शन घेण्याचे भाग्य यानिमित्ताने नाशिककरांना लाभले.
"शिवजन्मोत्सव समितीचे सलग दुसऱ्या वर्षी महिला अध्यक्ष म्हणून मान मिळाला. गर्वाची बाब आहे. विशेष म्हणजे महाराजांच्या विश्वविक्रमी वस्तू साकारणाऱ्या शिवजन्मोत्सव समिती एक भाग असल्याचा आनंद होत आहे." - शिल्पा सोनार, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष
"यंदा कवड्यांची माळ तयार करण्याची संकल्पना सुचली. त्यानुसार विश्वविक्रमी माळ तयार करण्यात आली आहे." - चेतन शेलार. अध्यक्ष. छत्रपती सेना