Nashik Political: सिडकोत राष्ट्रवादीच्या मदतीला धावली शिवसेना! महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या भूमिकेमुळे चर्चा

Apoorva Hire, Sudhakar Budgujar and Advaiya Hire
Apoorva Hire, Sudhakar Budgujar and Advaiya Hireesakal

Nashik Political : पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ अर्थात, सिडकोत हिरे व बडगुजर एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतानाही शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी चक्क हिरे कुटुंबीयांची बाजू घेत शासनालाही जबाबदार धरले आहे.

त्यांचे हे जबाबदारपणचे बोल सिडकोत चर्चेचे ठरत असून, अजब युतीबद्दलही सिडकोवासीय अवाक्‌ झाले आहेत. (Shiv Sena came to aid of Cidco NCP Discussion due to role of Metropolitan Sudhakar Badgujar Nashik Political)

आदिवासी सेवा समिती व महात्मा गांधी विद्यामंदिराचे मुख्य संचालक प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे व अद्वैय हिरे या हिरे कुटुंबीयांसह संस्थेशी संबंधितांवर बोगस शिक्षक भरतीचा भद्रकाली पोलिस ठाण्यात एक व नाशिक रोड पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल आहे.

पालकमंत्री व दाभाडी अर्थात, मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार दादा भुसे या सर्व प्रकरणाचे कर्तेधर्ते आहेत, हे लपून राहिलेले नाही. पालकमंत्री भुसे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यापासून त्यांच्या मतदारसंघातील नाराजी लपून राहिलेली नाही.

त्या शिवाय ॲन्टिइन्कम्बन्सी हा भागही आहे. त्यामुळे अद्वैय हिरे यांनी संधी साधत शिवसेनेत प्रवेश केला. भुसे यांच्यासाठी हिरे प्रतिस्पर्धी आहेत. त्यातूनच हिरे यांच्या ताकदीवर चौकशीच्या माध्यमातून हल्ले सुरू आहेत.

अर्थात, गुन्हा दाखल झाला, त्याअर्थी प्रकरणात गांभीर्य दिसून येत असून, अधिक चौकशी केल्यास यापेक्षा अधिक प्रकार बाहेर पडेल, अशीही चर्चा आहे. अटल लॅबची देखील चर्चा आहे. परंतु या प्रकरणानिमित्त राजकीय नेमबाजी सुरू आहे.

त्यात सिडकोत अजब प्रकार पाहायला मिळाला. शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांनी हिरे यांची बाजू घेत बोगस शिक्षकांचे वेतन शासनाकडूनच काढले जात होते. त्या वेळी शासन झोपले होते का, कागदपत्रे का नाही तपासली गेली, असा सवाल केला आहे.

Apoorva Hire, Sudhakar Budgujar and Advaiya Hire
Nashik Political News: अकार्यक्षम नेतृत्वामुळे बागलाण दुष्काळी यादीतून बाहेर : केशव मांडवडे

बडगुजर यांच्या भूमिकेमुळे मात्र सिडकोत वेगळीच चर्चा सुरू आहे. अपूर्व हिरे यांना पश्‍चिम विधानसभेतून निवडणूक लढवायची आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेशही केला आहे.

दुसरीकडे बडगुजर यांनाही आमदार व्हायचे आहे. त्यामुळे ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत, असे असतानाही बडगुजर यांनी हिरे कुटुंबीयांच्या बाजूने घेतलेल्या भूमिकेमागे राजकीय कंगोरे असल्याचे बोलले जात आहे.

ठाकरे गटातून शिंदे गटात भुसे यांचा प्रवेश त्यातून भुसे यांना टार्गेट करण्याचा एक भाग असू शकतो. तसेच अद्वैय हिरे शिवसेनेचे उपनेते असल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बाजू घेण्याचा भाग असू शकतो. परंतु प्रतिस्पर्धी अपूर्व हिरे यांचेही समर्थन सिडकोत अजब युतीच्या चर्चेला कारणीभूत ठरले आहे.

"शासनाच्या मंजुरीशिवाय भरती होत नाही. शासनाच्या मंजुरीने शिक्षकांचे पगार सुरू आहेत. बेकायदेशीर भरती असेल, तर शासनाने त्यांची पगाराची बिले मंजूर कशी केली. हिरे कुटुंबीयांना फसविण्याचा हा प्रयत्न दिसतो. भरतीला शिक्षणाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असेल तर ती बेकायदेशीर कशी ठरते. भरती बेकायदेशीर असेल शासन व अधिकारीही जबाबदार असून, त्यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. फक्त हिरे कुटुंबाला जबाबदार धरून चालणार नाही."- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना

Apoorva Hire, Sudhakar Budgujar and Advaiya Hire
Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट आमने-सामने; अजित पवार गटाने मागितली मुदतवाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com