२५० कोटींच्या रस्ते कामावरून शिवसेना आक्रमक

२५० कोटींच्या रस्ते कामावरून शिवसेना आक्रमक
Summary

बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या नावासह त्यांच्यावर दहा दिवसात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात रस्ते विकासकामांचा (Road development work in the city) बार उडविण्यात आला असला तरी रस्त्यांची गुणवत्ता सुमार दर्जाची असल्याने व वारंवार तक्रार करूनही गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेरीस शिवसेनेच्या वतीने पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्याचे पत्र सादर करण्यात आले आहे. त्यात बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या नावासह त्यांच्यावर दहा दिवसात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. (shiv sena has become aggressive over road works worth Rs 250 crore in nashik)

२५० कोटींच्या रस्ते कामावरून शिवसेना आक्रमक
जिल्‍हा मुख्याध्यापक संघाचा २८ जूनपासून उपोषणाचा इशारा

शिवसेनेचे विभागप्रमुख नीलेश साळुंखे यांनी पत्र दिले आहे. प्रभाग २३ व ३० मधील रस्ते कामाचा उल्लेख करताना शहरातील अडीचशे कोटी रुपयांच्या कामांचा उल्लेख करण्यात आला आहे. शहरात महिनाभरापासून रस्ते डांबरीकरण, रस्ते विस्तारीकरण, डीपी रोड विकसित करणे, रस्ते सरफेसिंग कामे मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आली आहे. अडीचशे कोटी रुपये किमतीचे कामे करताना दर्जेदार कामे अपेक्षित आहे, मात्र कामांची गुणवत्ता सुमार दर्जाची असल्याचा दावा श्री. साळुंखे यांनी केला आहे. जुने इंदिरानगर पोलिस ठाण्याजवळ रस्त्याचे काम सुमार दर्जाचे होत असल्याचे लक्षात आल्यानंतर काम थांबविण्यात आले.

२५० कोटींच्या रस्ते कामावरून शिवसेना आक्रमक
शिष्यवृत्तीच्या बहाण्याने पावणे तीन लाखाला पालकाला गंडविले

यासंदर्भात तक्रार केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी स्वतः कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनीदेखील काम सुमार दर्जाचे असल्याची कबुली दिली. संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्यानंतर काम व्यवस्थित होणे गरजेचे होते. त्यानंतरही कामाचा दर्जा सुमार राहिला. त्यामुळे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे पत्र पोलिस आयुक्तांना श्री. साळुंखे यांनी दिले. आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारावर दहा दिवसात फौजदारी गुन्हा दाखल करावा असे लेखी तक्रारीत म्हटले आहे. (shiv sena has become aggressive over road works worth Rs 250 crore in nashik)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com