Nashik Shivsena News: वाहतुक समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार! आॉनलाईन सर्व्हेच्या माध्यमातून जनसहभाग

Shivsena News
Shivsena Newsesakal

Nashik Shivsena News : राजकीय पक्षांनी आंदोलने, मोर्चा पुरते कार्यरत न राहता जनसहभागातून नागरिकांच्या पायाभूत सेवा-सुविधांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रत्यक्ष मत देखील मांडले पाहिजे या हेतूने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने शहरात महत्त्वाची समस्या ठरणाऱ्या वाहतुकीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाइन सर्वेक्षण सुरू केले आहे.

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. उर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून उपक्रम राबविला जात आहे. (Shivsena initiative to solve traffic problem Public participation through online survey Nashik News)

शहरात वाहतुकीची कोंडी हा नित्याचाच भाग झाला आहे. मुंबई, ठाणे व पुणे या शहरांपाठोपाठ वाहतूक कोंडीत नाशिकचा क्रमांक लागतो. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे चारचाकी वाहनांचा वापर कमी झाला आहे.

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी शासकीय यंत्रणांसह सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. त्यात आता राजकीय पक्षांनी प्रथम पुढाकार घेतला आहे. वाहतूक समस्या सोडविण्याची जबाबदारी फक्त वाहतूक पोलिस व महापालिकेची नाही तर नागरिकांचा देखील सहभाग महत्त्वाचा ठरतो.

त्यामुळे शिवसेनेच्या वतीने फेसबुकच्या माध्यमातून सर्वेक्षण करून त्यात वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी काय उपाययोजना करता येतील यासंदर्भात मते जाणून घेतली जात आहेत. फेसबुकच्या माध्यमातून प्राप्त अहवाल महापालिका व पोलिसांना दिला जाणार आहे.

नागरिकांच्या वाहतूक समस्या सोडविण्याबद्दलच्या सूचनांची दोन्ही आस्थापनांकडून अंमलबजावणीची अपेक्षा असल्याचे श्री. बोरस्ते यांनी सांगितले. दोन दिवसांसाठी सर्वेक्षण उपलब्ध आहे. सर्वेक्षणात पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांना मतेही मांडता येणार आहे.

Shivsena News
Shivsena Shinde Group: महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेला भगदाड; पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

सर्वेक्षणात महत्त्वाचे पर्याय

- वाहतूक पोलिसांची संख्या वाढविता येईल का ?

- वाहतूक पोलिसांची संख्या व कार्यक्षमता वाढविणे.

- रस्ते रुंदीकरण करणे क्रमप्राप्त आहे का?

- पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे.

- वाहन चालकांनी स्वयंशिस्त पाळणे.

- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे.

- सम-विषम पार्किंग व्यवस्था.

"नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसहभाग देखील आता महत्वाचा आहे. त्यासाठी शिवसेनेच्यावतीने ऑनलाईन सर्वेक्षण असून यामाध्यमातून जनमताचा कानोसा घेता येणार आहे." - अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट.

Shivsena News
Nashik Shivsena News : शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेपुढे प्रशासन नरमले; रस्ता होणार पूर्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com