शिवसेना फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग

Shivsena
ShivsenaGoogle

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने तयारी सुरु केली असून त्याचाचं एक भाग म्हणून कोअर कमिटीच्या बैठकीत शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामांचे निर्णय घेताना महागाईच्या प्रश्‍नावर केंद्र सरकार विरोधात भव्य मोर्चा शहरातून काढण्याचा निर्णय घेतला. (Shiv Sena started preparations for municipal elections)


आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सामुहिक निर्णय घेण्यासाठी शिवसेनेने पाच सदस्यांची कोअर कमिटी गठीत केली आहे. जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी आमदार वसंत गिते, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांचा कमिटी मध्ये समावेश आहे. जानेवारी २०२२ मध्ये महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सत्ता मिळविण्यासाठी सामुहिक प्रयत्नांचा एक भाग म्हणून गठीत केलेल्या कोअर कमिटीची पहिली बैठक झाल पार पडली. बैठकीत संघटना बळकट करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. संघटना मजबुत करण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सत्ताधारी भाजपकडून आश्‍वासनांची पुर्तता न झाल्याने त्या विरोधात मतदारांसमोर हिशोब मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचे मार्केटींग, खासदार व आमदार निधीतून करावयाची कामे आदींचा आढावा घेण्यात आला. शहरासंदर्भातील प्रश्‍न शासन दरबारी सोडविण्यासाठी शासन दरबारी धाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Shivsena
अखेर पंचवटी एक्स्प्रेस होणार सुरू! नाशिक-मुंबई प्रवास सोयीचा



केंद्रा विरोधात आंदोलन
इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्यातून महागाई मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. त्यामुळे या मुद्यावर भाजप विरोधात रान पेटविण्यासाठी शहरात मोठे आंदोलन उभारले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी दिली.



कोअर कमिटीच्या बैठकीतील निर्णय
- मुंबईच्या धर्तीवर झोपडपट्टीमुक्तीसाठी एसआरए योजना.
- वाहनतळांच्या जागेवर मल्टीस्टोअर पार्किंग.
- शहरातील पार्किंग समस्या सोडविणार.
- तपोवनातील सिंहस्थाच्या जागेवर प्रदर्शन स्थळ.
- शासनामार्फत गोदावरी रिव्हर फ्रन्ट योजना राबविणार.
- पुररेषेतील बांधकामांना दिलासा मिळण्यासाठी प्रयत्न.
- मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर भव्य रुग्णालय.
- काळाराम मंदीर व परिसर सुशोभिकरण.

Shivsena
नाशिक-सुरत महामार्गासाठी जमीन हस्तांतरण सुरु


महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून कोअर कमिटीची पहिली बैठक झाली. यात शहराशी संबंधित प्रश्‍न शासन दरबारी सोडविण्यासाठी धाव घेतली जाणार आहे. महागाई विरोधात शहरात भव्य मोर्चा काढला जाणार आहे.
- विजय करंजकर, जिल्हाप्रमुख.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com