esakal | काळ आला होता, पण..! पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बस पलटी; रात्रीचा थरारक प्रकार वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

shivshahi bus.jpg

पुणे - नाशिक  महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत शिवशाही नाशिकवरून पुण्याच्या दिशेने जात होती. अचानक येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस रस्ता उतरून डाव्या बाजूला रस्त्यावर पलटी झाली. रात्री घडलेल्या या थरारनाट्यात काय घडले वाचा...

काळ आला होता, पण..! पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बस पलटी; रात्रीचा थरारक प्रकार वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पुणे - नाशिक  महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत शिवशाही बस क्रमांक ( एम.एच.०६ बी.डब्लू. ०६४१) नाशिकवरून पुण्याच्या दिशेने जात होती. कळंब गावच्या हद्दीत समोरून अचानक येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस रस्ता उतरून डाव्या बाजूला रस्त्यावर पलटी झाली. रात्री घडलेल्या या थरारनाट्यात काय घडले वाचा...

काळ आला होता पण...

पुणे - नाशिक  महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत रात्री साडेआठ वाजता नाशिक ते पुणे शिवशाही बस पलटी झाली. शिवशाही बस क्रमांक ( एम.एच.०६ बी.डब्लू. ०६४१) नाशिकवरून पुण्याच्या दिशेने जात होती. कळंब गावच्या हद्दीत समोरून अचानक येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस रस्ता उतरून डाव्या बाजूला रस्त्यावर पलटी झाली. बसमध्ये १२ प्रवासी होते. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  

मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

सुदैवाने या अपघातातून १२ प्रवासी वाचले .बसमधील दोन प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. लॉकडाउननंतर शासनाने एसटी सेवा हळूहळू सुरू केली असून नुकतीच शिवशाही बस सेवा सुरू झाली आहे. शिवशाही बसचे यापूर्वी अनेक वेळा अपघात झाले आहेत. मात्र एसटी सेवा सुरु झाल्यानंतरचा हा पहिला अपघात कळंब गावच्या हद्दीत झाला .सुदैवाने यात प्रवासी बचावले आहेत.

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले?

जेसीबीच्या सहाय्याने हटविली अपघातग्रस्त बस

उद्योजक नितीन भालेराव व अन्य ग्रामस्थ मदतीसाठी धावले. उपस्थित ग्रामस्थांनी प्रवाशांना बाहेर काढले. महेश थोरात यांनी तात्काळ आपला जेसीबी आणून जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस रस्त्यातून बाजुला काढली. त्यानंतर वाहतुक पुर्ववत सुरू झाली. बारा प्रवाशांपैकी दोन प्रवाशांना किरकोळ मार लागला होता. उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्का

प्रवाशांवर मंचर येथे उपचार

उर्वरित प्रवाशांना थोडासा मार लागल्याने ग्रामस्थांच्या मदतीने त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर पुणे-नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली. 

loading image
go to top