shubham Bhandare
shubham Bhandareesakal

Nashik News : कसबे सुकेणेचा तरुण चीनमध्ये करणार भारतीय संघाचे प्रतिनिधित्व!

Nashik News : कसबे सुकेणे (ता. निफाड) येथील क्रीडापटू शुभम श्रीधर भंडारे याची देदीप्यमान यशाची कमान उत्तरोत्तर चढतच असून आंतरराष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेसाठी भारतातर्फे त्याची निवड झाली आहे.

नुकत्याच भुवनेश्वर, ओडिशा येथे पार पडलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स निवड चाचणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय ॲथलेटिक्स संघात स्थान निश्चित केले आहे. (Shubham Bhandare will represent Indian team in China nashik news)

आता पुन्हा चेंगडू, चीन येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये शुभम भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

शुभम भंडारे याने या पूर्वी झालेल्या २३ वयोगटातील राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये शुभमने सुवर्णपदक प्राप्त केले होते. कौतुकाची बाब म्हणजे या अगोदर देखील शुभमने महाराष्ट्राला आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सुवर्णपदक प्राप्त करून दिले.

पश्चिम दक्षिण विभागीय भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत त्याने नवीन विक्रम करून सुवर्णपदक मिळवून कसबे सुकेणे गावाचे व त्याचे महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओझर मिगचे नाव उंचावले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

shubham Bhandare
Masharashtra Krushi Din 2023 : अन्नदाता सुखी भव! पण कधी? शेती विरोधी धोरणाने खोडा

त्याच्या या उत्कृष्ट, ऐतिहासिक कामगिरीसाठी मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, उपसभापती डी. बी. मोगल, निफाड संचालक शिवाजी पाटील गडाख, सरपंच आनंदा भंडारे, बाळासाहेब जाधव, रमेशराव उगले, अशोक भंडारे, अतुल भंडारे, मोतीराम जाधव, विश्वास भंडारे आदींनी अभिनंदन केले.

"शुभम आमच्या कसबे सुकेणे गावची शान असून तो उत्तरोत्तर प्रगती करत आहे. ता तो थेट भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. चीन येथील स्पर्धेत त्याने सुवर्ण कामगिरी करून ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करावे ही कसबे सुकेणेकरांची अपेक्षा आहे." -अतुल भंडारे, ग्रामस्थ, कसबे सुकेणे

shubham Bhandare
Nashik Rain News : इगतपुरीत पावसाची जोरदार हजेरी; धुके, ढगाळ वातावरणाने पर्यटकांची गर्दी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com