गरिबीवर मात करत सिद्धीने गाठले यशाचे शिखर; गावातून प्रथम

घरात अठराविश्वे दारिद्र्य असताना त्यावर मात करत लासलगावात प्रथम येण्याचा मान तिने पटकावला आहे.
SSC Success
SSC Successesakal

लासलगाव (जि. नाशिक) : घरात अठराविश्वे दारिद्र्य असताना त्यावर मात करत लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयाची विद्यार्थिनी सिद्धी चंद्रकांत जाधव हिने लासलगावात प्रथम येण्याचा मान पटकावला असून तिला ९५.४० टक्के गुण मिळाले आहे.

अतिशय सामान्य परिस्थितीत वडील चंद्रकांत जाधव खाजगी दुकानात चालक म्हणून काम करून, तर आई उपजिविकेसाठी कांद्याच्या गोण्या शिवून आपला संसाराचा गाडा चालवत असताना मुलगी सिद्धी हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शालांत परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

आईला संसाराचा गाडा हाकण्यासाठी पूर्ण मदत करून उर्वरित वेळेत छोट्या जागेत प्राप्त परिस्थिती अभ्यास केला अतिशय तोकड्या सुविधा उपलब्ध असताना सिद्धीने यशाचे शिखर गाठले आहे. तिच्या या यशाबद्दल लासलगाव परिसरात तिचे कौतुक होत आहे.

SSC Success
SSC Result : योगायोग की चमत्कार? जुळ्या बहिणींना मार्क देखील सेम टू सेम

सिद्धी पुढील शिक्षण लासलगाव येथे घेणार असून, तिला आयटी क्षेत्रात इंजिनियर व्हायचे आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुनील आब्बड, कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, सचिव शांतिलाल जैन, सदस्य मोहन बरडिया, महावीर चोपडा, प्राचार्य कैलास भारती, सतीश पवार, शिवाजी धुमाळ, रूपाली चव्हाणके, उद्योजक संतोष पलोड, साहित्यिक अरुण भांबारे यांनी अभिनंदन केले.

''परिस्थितीचे कारण न सांगता मिळेल त्या वेळेचा सदुपयोग करून नियमित अभ्यास केल्यास यशाचे शिखर सहज गाठता येते. याकामी मला आई-वडील व शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी पडले.'' - सिद्धी जाधव, प्रथम विद्यार्थिनी

SSC Success
SSC Result : शेतीकाम करून वैष्णवीने मिळवले यश; वडिलांची केली स्वप्नपूर्ती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com