Nashik News: सिन्नरच्या सरदवाडी रस्त्यावर अवतरली गटारगंगा! नागरिकांना करावा लागतोय दुर्गंधीचा सामना

Drainage Water Flowing on Sinnar Roads
Drainage Water Flowing on Sinnar Roadsesakal

Nashik News : सिन्नर नगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका महत्त्वाची उपनगर असलेल्या सरदवाडी रस्त्यावरील अजिंक्यतारा चौक परिसरातील रहिवाशांना बसला आहे.

या भागात गेल्या आठ दिवसांपासून तुंबलेल्या गटारीचे पाणी थेट रस्त्यांवरून वाहत असल्यामुळे रोगराई निर्माण होण्याची भीती आहे. (Sinnar Sardwadi road become sewer Citizens had face problem of contaminated water Nashik News)

रस्त्यावरील वर्दळीच्या भागात गटारगंगा अवरल्याने त्याचा त्रास परिसरातील रहिवासी व्यावसायिक यांना सहन करावा लागत आहे.
रस्त्यावरील वर्दळीच्या भागात गटारगंगा अवरल्याने त्याचा त्रास परिसरातील रहिवासी व्यावसायिक यांना सहन करावा लागत आहे. esakal

अजिंक्यतारा हॉटेल ते वाजे लॉन्स या सरदवाडी रस्त्यावरील वर्दळीच्या भागात गटारगंगा अवरल्याने त्याचा त्रास परिसरातील रहिवासी व्यावसायिक यांना सहन करावा लागत आहे.

पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे तुंबलेल्या गटारींची नियमित स्वच्छता होत नाही त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून अजिंक्यतारा चौक परिसरात गटारीचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे.

हे दुर्गंधीयुक्त पाणी सतत वाहत असल्याने परिसरात डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

Drainage Water Flowing on Sinnar Roads
Nashik News : थकबाकी वसुलीसाठी डिसेंबर अखेरचा अल्टीमेटम; पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीसाठी विशेष मोहीम

गटारी चोकअप झाल्यावर त्यांची स्वच्छता करणे ऐवजी पालिकेचे कर्मचारी ठिकठिकाणी गटार उघडी करून पाणी रस्त्यावर काढत असल्याचे या भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे.

अनिकेत प्रशासकीय राजवट असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिलेले नाही. याबाबत पालिका मुख्यालयात तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

Drainage Water Flowing on Sinnar Roads
Nashik Tree Cutting : विनापरवानगी वृक्षतोडप्रकरणी व्यावसायिकासह महाविद्यालयास 3 लाखाचा दंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com