
नाशिक / सिन्नर : दगडी वास्तुकलेतील स्थापत्यशैलीचे उत्तम प्रतीक असलेले सिन्नर येथील बाराव्या शतकातील हेमाडपंती गोंदेश्वर मंदिर पर्यटनाचे एक विशेष केंद्र...परदेशी पाहुण्यासह चित्रपट सृष्टीतील अनेकांचे चित्रीकरणासाठी आवडते ठिकाण.. दगडी वास्तु आणि त्यावरील स्थापत्यकलेमुळे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशाला याचे वेगळे आकर्षण आहे. हेच की काय भारत सरकारकडून हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित मात्र ऐवढी प्रचिती आणि इतिहास असताना देखील आज सिन्नरचे हे मंदिर अनेक वर्षांपासून विकासापासून दुर्लक्षित झाल्याचे चित्र आहे.
नाममात्र डागडुजीशिवाय काहीही नाही
सिन्नर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेले हेमाडपंती गोंदेश्वर मंदिर बाराव्या शतकात गवळी राजा राजगोविंद यांनी निर्माण केल्याची नोंद आढळते. पुरातन स्थापत्यशैलीचा आणि काळ्या दगडात कोरलेल्या मूर्तिकामामुळे हे मंदिर पर्यटकांना आकर्षित करते. पाच मंदिराचा समूह असलेल्या या मंदिराला शैव पंचायतन म्हटले जाते. दररोज याठिकाणी पर्यटकांचा राबता. मात्र एवढे असूनही देखणे असे दगडी वास्तुकला असलेले मंदिर आजही विकासापासून कोसो दूर असल्याचेच दिसत आहे. केवळ पुरात्तव विभागाकडून नाममात्र डागडुजीशिवाय कोणत्याही प्रकारची सुधारणा शासनाकडून अद्यापही येथे करण्यात आलेली नाही.
अनेक घोषणा हवेतच विरल्या
मंदिराचा परिसर मोठा असल्याने येथे पर्यटनासाठी विविध साधनांची निर्मिती करून राज्यातील एक पर्यटनाचे स्थळही होऊ शकते या हेतूने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. पण त्यातील फक्त दीड कोटी रुपयांचे काम झाले. यात मंदिराभोवती संरक्षण भिंत बांधण्यात आली मात्र ती पण अर्धवट बांधली गेली. यामुळे मंदिराचा परिसर अस्वच्छतेच्या गर्तेत आला. गोंदेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी लोकप्रतिनिधींनीही अनेक घोषणा केल्या मात्र त्या जणू हवेतच विरल्या आहेत.
पुरातन मंदिराच्या देखभालीकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्षच केले आहे. मंदिराच्या कळसाकडील एका बाजूचा मोठा दगड निघालेल्या अवस्थेत आहे. तो जर ढासळला तर भारतीय वास्तुकलेतील एक सुंदर मंदिर जमीनदोस्त व्हायला वेळ लागणार नाही. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिल्यास एका चांगल्या पर्यटनस्थळाची निर्मिती होऊ शकते. - दत्ता शेळके (जिल्हा संघटक, ग्राहक मंच, सिन्नर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.