Nashik Accident News : नाशिकमध्ये अपघातात सहा ठार

नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील पेट्रोलपंपाजवळ मोटार- मोटारसायकलच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले. बसचालकाचा ताबा सुटल्याने ती मोटारसायकलवर धडकली.
Nashik Accident News
Nashik Accident Newssakal

दिंडोरी (जि. नाशिक) : नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील पेट्रोलपंपाजवळ मोटार- मोटारसायकलच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले. बसचालकाचा ताबा सुटल्याने ती मोटारसायकलवर धडकली.

भरधाव मोटार पुढील वाहनांना ओव्हरटेक करताना समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने मोटारसायकलला धडक दिली.

यात मोटारीतील मुकेश कुमार यादव (वय २५), अमन रामकिसन यादव (१८), कुसूमदेवी रामकिसन यादव (४५, सर्व रा. ड्रीम कॅसल, नाशिक, मूळ रा. बनारस), तर मोटारसायकलवरील अनिल चिमाजी बोडके आणि राहुल अनिल बोडके (रा. नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला.

Nashik Accident News
Accident : उदगीर बिदर रस्त्यावर क्रुझर-कारचा अपघात; बारा जण जखमी

रामकिसन यादव हे द्राक्षाचे मोठे व्यापारी होते. आज सकाळी ते सप्तशृंग गडावर दर्शनासाठी आपल्या कुटुंबाबरोबर गेले होते. दर्शन करून परतताना झालेल्या अपघातात रामकिसन यांच्यासह परिवारातील चार जण ठार झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com