esakal | घरगुती वीजग्राहकांचे मीटर होणार 'स्मार्ट'! रीडिंगच्या विविध तक्रारींवर ऊर्जा विभागाचा तोडगा
sakal

बोलून बातमी शोधा

nitin raut

घरगुती वीजग्राहकांचे मीटर होणार स्मार्ट! ऊर्जामंत्र्यांचे निर्देश

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : घरगुती वीजग्राहकांच्या मीटर रीडिंगबाबतच्या विविध तक्रारींवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला असून, घरगुती वीजग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद यांसारख्या महानगरांत प्राथमिक स्तरावर हे स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. स्मार्ट मीटर योजनेबाबत मंगळवारी (ता. २०) मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. (smart-meters-for-household-consumers-said-nitin-raut-marathi-news-jpd93)

...हे आहेत स्मार्ट मीटरचे फायदे

मोबाईलच्या सिमकार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रूपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल. वीज वापरानुसारच बिल येईल, तसेच प्रीपेड मीटरमध्ये तर जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल. परिणामी, विजेची बचत होईल. वीजबिल बिनचूक दिले जाईल. मीटरमध्ये छेडखानी करून वीजचोरीचा प्रयत्न होत असल्यास त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येईल व ती रोखणे शक्य होईल. त्यामुळे वीजचोरीस आळा बसेल व विजेचा काटकसरीने विवेकी वापर करण्याला प्रोत्साहन मिळेल. स्मार्ट मीटरमुळे दूरस्थ पद्धतीने माहितीची देवाणघेवाण आणि वीजभाराचे व्यवस्थापन अगदी कमीतकमी वेळेत करता येईल. याचा फायदा ग्रीडचे व्यवस्थापन स्मार्ट पद्धतीने करता येणे शक्य आहे. दूरस्थ पद्धतीने मीटर चालू किंवा बंद करता येईल, ज्यामुळे खर्चावर नियंत्रण येईल. तसेच एखाद्या दूरस्थ पद्धतीने बसून मीटरमध्ये संचित झालेला डेटा मुख्यालयात परिक्षणासाठी घेतला जाऊ शकतो. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, मराविम सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महावितरणचे संचालक (वित्त) रवींद्र सावंत, महावितरणचे कार्यकारी संचालक अरविंद भादीकर या वेळी उपस्थित होते.

‘जीवनप्रकाश’ची व्याप्ती वाढविण्याचा विचार

अनुसूचित जाती व जमातीतील ग्राहकांना नाममात्र दरात वीजजोडणी देण्यासाठीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देशही डॉ. राऊत यांनी दिले. गरजूंना नाममात्र अनामत रक्कम जमा करून वीजजोडणी देणारी ही योजना केवळ दोन समाजांपुरती मर्यादित न राहता सर्वसमावेशक करायला हवी. यासाठी प्रस्ताव तयार करून सादर करा, असे निर्देश त्यांनी दिले.

हेही वाचा: नाशिक : कारवर झाड कोसळून तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू!

हेही वाचा: अनुकंपाच्या नियुक्तींसाठी ऑगस्टमध्ये शिक्षण दरबार : बच्चू कडू

loading image