Nashik News : जिल्ह्यातील माती नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर

Soil in district on kartavya path in New Delhi nashik news
Soil in district on kartavya path in New Delhi nashik newsesakal

Nashik News : ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’ अंतर्गत ९ ते ३० ऑगस्ट दरम्यान सर्व पंचायती आणि ब्लॉक स्तरावर ‘मेरी माती- मेरा देश’ हा उपक्रम राबविला जाणार आहे.

या कार्यक्रमाची सांगता दिल्लीच्या कर्तव्य पथावर होणार आहे. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून माती गोळा केली जाणार आहे. (Soil in district on kartavya path in New Delhi nashik news)

देशभरातील माती एकत्रित करून त्याचा कलश दिल्लीच्या कर्तव्य पथावर नेला जाणार असून तेथे प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या मातीतून बाग तयार केली जाणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात या अभियानांतर्गत माती गोळा केली जाणार आहे.

यात १६ ते २५ ऑगस्ट या कालावधीत शहरी भागात स्वयंसेवक ब्लॉक स्तरावर जाऊन गावोगावी माती गोळा करून ती २५ ऑगस्टपर्यंत जमा केले जाईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Soil in district on kartavya path in New Delhi nashik news
Manipur Violence : हिंसाचाराने धुमसणाऱ्या मणिपूरला नाशिकचा कांदा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे ट्विट

त्यानंतर २७ ऑगस्टपर्यंत ही माती राजधानी दिल्लीत कर्तव्यदक्ष मार्गावर नेण्यात येईल. ३० ऑगस्टला कर्तव्य पथावर समारोप होईल.

त्यात गावातून आणलेली माती टाकून कर्तव्य मार्गावर बाग तयार कली जाणार आहे. ज्याचे नाव अमृत वाटिका असेल.

हा उपक्रम ९ ऑगस्टपासून सुरू होऊन ३० ऑगस्टपर्यंत चालणार आहे. कर्तव्य पथावर तयार होणाऱ्या बागेच्या ठिकाणी प्रत्येक फलकावर स्वातंत्र्यसैनिकांची नावे लिहिली जातील.

Soil in district on kartavya path in New Delhi nashik news
Nashik News : प्रसूतिवेदना सहन करीत महिलेची अडीच किलोमीटर पायपीट! मृतदेह नेण्यासाठी करावी लागली डोली...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com