Sakal Exclusive : अहो आश्चर्यम..! सोयाबीनच्या दरात 500 ने घट

Yewla : A farmer shopping at a seed shop.
Yewla : A farmer shopping at a seed shop.esakal

Nashik News : मागील सलग तीन वर्ष बियाण्यांच्या मोठ्या दरवाढीचा बोजा शेतकऱ्यांवर पडत होता, त्यामुळे या कंपन्यांवर कुणाच्या अंकुश आहे की नाही असा संतप्त सवाल शेतकरी करत होते.

यावेळी मात्र निवडणुका आल्या म्हणून की काय पण बियाण्यांची दरवाढ नव्हे तर दरात घट झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (Soybean price reduced by 500 Maize increased by 100 Relief in seed price hike after three years Nashik News)

विशेष म्हणजे सर्वाधिक मागणी असलेल्या सोयाबीनच्या दरात ५०० ते ८०० रुपयांनी घट झाली आहे, तर जिल्ह्याचे प्रमुख पीक बनवू पाहणाऱ्या मकाच्या बियाण्यात मात्र १०० ते १५० रुपयाची वाढ झाली आहे.

बियाण्याच्या दरात दरवर्षीच ५०० ते हजारांपर्यत वाढ होत असताना यंदा थोडा लगाम लागला आहे. जिल्ह्याचा पीक पॅटर्न मागील दोन तीन वर्षात बहुतांशी बदलला असून खरिपात मकाचा व सोयाबीनचा जिल्हा अशी ओळख तयार होऊ लागली आहे.

यंदा देखील मकासह सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार असून बेभरवशाचा कांद्याचे क्षेत्र आहे तसेच राहील. मकाचे क्षेत्र वाढणार असले तरी बियाणे दरात दरवर्षीच्या तुलनेत ५० ते शंभर रुपयापर्यंत वाढ झाली आहे.

मका, बाजरी, कपाशीच्या दरात वाढ होत असतानाच सोयाबीनचे क्षेत्र देखील वाढत असल्याने बियाण्याला मागणी वाढल्याने दर स्थिर असले तरी अगोदरच ते गगनाला भीडल्याने यंदाही शेतकऱ्यांना एकूण बियाण्याच्या खरेदी मागे हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार हे मात्र नक्की!

Yewla : A farmer shopping at a seed shop.
Nashik Traffic News : ट्रॅफिक जामचा तिढा काही सुटेना; सायंकाळी 2 तास लागतात वाहनांच्या रांगाच रांगा

सोयाबीनची घट आश्चर्यकारक!

२०२१ मध्ये सोयाबीनचे दर १० ते १२ हजारांवर गेले होते. त्यातच खरिपात पैसे देणारे पिक असल्याने जिल्ह्यात सोयाबीन पेरणी क्षेत्रही वाढले अन्‌ बियाण्याच्या दरात मागील वर्षी विक्रमी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.

मात्र मागील वर्षी सोयाबीनच्या दराने गटांगळ्या खाल्ल्याने त्याचा परिणाम बियाण्यांच्या दरावर झाला असून यावर्षी तब्बल ५०० ते ८०० रुपयांनी घट झाली आहे.

फुले संगम, एक्सलंट, करिष्मा या वाणांना जिल्ह्यात मागणी असते. मागील वर्षी सोयाबीनची पिशवी सरासरी ३००० ते ३२०० रुपयांना मिळत होती. यंदा हाच दर २५०० ते २७०० रुपयांवर घटला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Yewla : A farmer shopping at a seed shop.
Mumbai Crime News: भांडणात बापाचा संयम सुटला अन् मुलीवर पेट्रोल शिंपडून...

मकाचे क्षेत्र वाढ, दरही वाढले!

वाढलेली मागणी सोबतच दरातील होणाऱ्या वाढीमुळे मका जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लाडके पीक बनत असून याचमुळे बियाण्याची मागणी वाढल्याने कंपन्यांनी मागील वर्षी २५ व २७ किलोच्या पिशवीमागे ५०० ते १००० रुपयांची वाढ केली होती.

मात्र यंदा बहुतांशी कंपन्यांनी अल्पशी दरवाढ केल्याचे दिसते. अनेक कंपन्यांच्या पिशव्या बाजारात विक्रीला असून यावर्षी १४०० ते १९०० रुपये दरम्यान त्यांच्या किमती आहेत. म्हणजेच ५० ते १५० रुपयांची वाढ मका बियाण्यात झाली आहे.

हायटेक, महिको, पायोनियर, सीजेंटा, ऍडव्हान्टा आदी कंपनीच्या वानाला जिल्ह्यात मागणी असते. कपाशीच्या बीटी २ बियाण्यांचे दर दरवाढ शासनाच्या मान्यतेने होत असून मागील वर्षी ५० रुपयांची वाढ झाली होती.

यावर्षीही अल्पशी वाढ झाल्याने ८३० रुपयांची पिशवी ८५३ रुपयांना शेतकऱ्यांना मिळणार आहे. बाजरी, तुर, मूग या बियाण्यांच्या पाकिटांमध्येही ५० ते १०० रुपयांच्या आसपास दरवाढ झाली आहे.

Yewla : A farmer shopping at a seed shop.
Nashik News : शिक्षकांच्या वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू; या तारखेपर्यंत नोंदणीस मुदत

"पावासाच्या आगमनावर पेरणीचे चित्र ठरेल. मात्र जिल्ह्यात सोयाबीन, मक्‍यासह बाजरीच्या क्षेत्रात वाढ होईल असे चित्र आहे. मागणी,बाजारभाव विचारात घेऊन बियाण्यांचे दर ठरले आहे. खूप वाढ नसल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे."

- नितीन काबरा

"यंदा मका व सोयाबीनचे क्षेत्र वाढेल तर मुगासह कडधान्य पावसावर क्षेत्र ठरेल असा अंदाज आहे. सोयाबीन दरात घट झाली तर बाजरी, मका, कपाशीसह इतर बियाण्याचे दरात अल्प वाढ झाली आहे. अद्याप पावसाचे आगमन नसल्याने बियाणे खरेदी होत नसली तरी शेतकरी चौकशी करत आहेत."

- दिनेश मुंदडा

Yewla : A farmer shopping at a seed shop.
Nashik News : शिक्षकांच्या वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू; या तारखेपर्यंत नोंदणीस मुदत

असे वाढले बियाणे पॉकिटाचे दर... (रुपयांत)

पीक/बियाणे - यावर्षीचे दर (कंसात मागील वर्षीचे दर)

मका ७५१ ---इलाईट - १५०० - (१३५०)

मका पयोनियर ३३०२ - १३०० (११५०)

मका पयोनियर ३५२४ - १९५० (१७००)

मका ७५९ - १५०० (१३५०)

मका ६६६८+ - १५०० (१४००)

मका ६२४०+ - १२८० (१२८०)

मका ३८४५ - १३३० (१४००)

सोयाबीन महाबीज - २७०० (३१००)

सोयाबीन ३३५ ईगल - २६५० (३८००)

सोयाबीन ३३५ एक्सलट - २८०० (३८००)

सोयाबीन ९३०५ उत्तम - ३३३० (३९००)

सोयाबीन करिश्मा विगर - ४१०० (४५००)

बाजरी धान्या ७८७२ - ५५० (५००)

बाजरी ३७ अजित - ५१० (५१०)

बाजरी २०४ महिको- ६०० (६१०)

मूग-नवल/कोपरगाव - ३१० (२५०)

मूग-अजित - ६५० (--)

तूर-दुर्गा - ५२५ (४५०)

कपाशी - ८५३ (८३०)

Yewla : A farmer shopping at a seed shop.
Nashik Accident News : कसारा घाटात 4 वाहनांचा विचित्र अपघात ; 2 जण ठार,1 जखमी; शेकडो कोंबड्या मृत्युमुखी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com