esakal | नाशिकमधून स्पाईस जेट सेवा विस्तारणार; कंपनी अधिकाऱ्यांचे उद्योजकांना आश्‍वासन 
sakal

बोलून बातमी शोधा

spicejet.jpg

स्पाईस जेट कंपनीमार्फत हवाई सेवा सुरु केली जाणार असून निरंतर सेवा सुरु राहण्याच्या उद्देशाने स्पाइस जेटच्या अधिकाऱ्यांनी औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.​

नाशिकमधून स्पाईस जेट सेवा विस्तारणार; कंपनी अधिकाऱ्यांचे उद्योजकांना आश्‍वासन 

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : नाशिकहून दिल्ली व हैद्राबाद येथे वीस तर दिल्ली साठी २५ नोव्हेंबर पासून स्पाईस जेट मार्फत हवाई सेवा सुरु होणार असून प्रतिसाद मिळाल्यास गोवा, चेन्नई या शहरांसाठी हवाई सेवा सुरु करण्याचे आश्‍वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले. स्पाईस जेट कंपनीमार्फत हवाई सेवा सुरु केली जाणार असून निरंतर सेवा सुरु राहण्याच्या उद्देशाने स्पाइस जेटच्या अधिकाऱ्यांनी औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

हवाई सेवेचा विस्तार 

नाशिकहून दिल्ली, हैद्राबाद व बेंगलुरु शहरांसाठी हवाई सेवा सुरु करताना आनंद होत असून नाशिकच्या विकासाला पुरक सेवा राहील असा विश्‍वास कंपनीचे सेल्स व्यवस्थापक किनारी मेहता यांनी व्यक्त केला. पुढील दहा दिवसांमध्ये उद्योजक संघटनांनी केलेल्या मागण्या व समस्या सोडविण्याचे आश्‍वासन देण्यात आले. पहिल्या टप्प्यात हैदराबाद व दिल्ली सेवा दिली जाईल. प्रतिसाद मिळाल्यानंतर अन्य शहरांमध्ये सेवा सुरु करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

ही असेल हवाई सेवेची वेळ 

वीस नोव्हेंबर पासून हैद्राबाद-नाशिक सेवा सुरु होईल. हैद्राबाद येथून सकाळी १०.३५ वाजता नाशिककडे उड्डाण होईल. दुपारी १२ वाजून पाच मिनिटांनी ओझर विमानतळावर पोहोचेल. ओझरहून दुपारी १२.३५ वाजता हैद्राबादकडे उड्डाण झाल्यानंतर दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. बेंगलुरु वरून सकाळी ११.२० वाजता ओझरकडे उड्डाण होईल. दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. नाशिक हून १२.५५ वाजता बेंगलुरु कडे उड्डाण होईल. दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. २५ नोव्हेंबर पासून दिल्ली सेवा सुरु होईल. दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी ओझरकडे उड्डाण होईल. संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. संध्याकाळी पाच वाजून ३५ मिनिटांनी दिल्लीकडे उड्डाण होईल. सात वाजून २५ मिनिटांनी दिल्लीत पोहोचेल. 

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

अंबड येथील आयमा रिक्रिएशन सेंटर येथे झालेल्या बैठकीला खासदार हेमंत गोडसे, आयमाचे अध्यक्ष वरूण तलवार, महाराष्ट्र चेम्बर चे अध्यक्ष संतोष मंडलेचा, नाइस चे उपाध्यक्ष रमेश वैश्य, स्पाइस जेट कंपनीचे वितरण व्यवस्थापक किन्नरी मेहता, आदींनी देशांतर्गत व देशाबाहेर नाशिकहून सेवा सुरु होण्याचे महत्व पटवून दिले. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी गोव्यासाठी सेवा सुरु करण्याची मागणी केली. रावल यांनी निरंतर सेवेची मागणी करताना चेन्नई साठी सेवा सुरु करण्याची मागणी केली. 

loading image