Gudhi Padwa Festival : गुढीपाडव्याच्या सुवर्णखरेदीला रतनलाल सी. बाफनात उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratanlal C. Customers rush to buy gold at Bafna Jewellers' gold bank on the auspicious occasion of Gudi Padwa.

Gudhi Padwa Festival : गुढीपाडव्याच्या सुवर्णखरेदीला रतनलाल सी. बाफनात उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक : गुढीपाडवा हा सुवर्ण खरेदीसाठी नेहमीच लाभदायी मुहूर्त ठरला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या शुभ मुहूर्तावर सोने व सोन्याचे दागिने ग्राहक नेहमीच खरेदी करतात. रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स कडेही गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला प्रचंड प्रतिसाद लाभला.

तसेच, मागच्या वर्षीच्या गुढी पाडव्याला सोनेखरेदी केलेल्या ग्राहकांना १६.४४ टक्के इतका घवघवीत नफा मिळाला. (spontaneous response on Gudhi Padwa Festival in Ratanlal C bafana jewellers nashik news)

२ एप्रिल रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी सोन्याचा भाव ५१, ७०० इतका होता. तो २० मार्च २०२३ रोजी ६०, २०० इतका वाढल्याने, नफा मिळाला. तसेच रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सने खास गुढी पाडव्यानिमित्त लेटेस्ट कलेक्शनही सादर केले होते.

हे आकर्षक कलेक्शन महिलावर्गाच्या पसंतीला उतरले. गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून असंख्य ग्राहकांनी सुवर्णखरेदीचा योग्य जुळवून आणला. आर. सी. बाफना मधील उत्कृष्ट सेवा, जिव्हाळ्याची वर्तणूक, पारदर्शक व्यवहार व उत्कृष्ट गुणवत्ता यांचा अनुभव घेतला. असे रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक राहुल बाफना यांनी सांगितले.