esakal | नाशिकमध्ये ‘स्पुटनिक’ लस उपलब्ध; 9 रुग्णालयात लसीकरण सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

sputnik vaccination

नाशिकमध्ये ‘स्पुटनिक’ लस उपलब्ध; 9 रुग्णालयात लसीकरण सुरू

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्डचे मोफत डोस दिले जात असले तरी अनेकांना रशियन बनावटीच्या स्पुटनिकचे आकर्षण असल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नागरिकांनी जाहीर करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयात लस टोचून घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. (Sputnik-vaccine-available-in-Nashik-start-vaccination-jpd93)

खासगी रुग्णालयात ‘स्पुटनिक’ उपलब्ध

शहरात कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन या दोन भारतीय बनावटीच्या, तर रशियातील स्पुटनिक या तीन प्रकारच्या लस उपलब्ध आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये लसीचे शुल्क आकारून ही लस दिली जात असून, सद्यःस्थितीत शहरात नऊ खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू आहे. ज्या नागरिकांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे त्यांनी रुग्णालयांमध्ये जाऊन लस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व केंद्रांवर कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिनचे मोफत लसीकरण सुरू आहे. अपोलो हॉस्पिटल, अशोका हॉस्पिटल, मानवता हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, एसएमबीटी हॉस्पिटल, सुश्रुत हॉस्पिटल, सुयश हॉस्पिटल, व्होकार्ट हॉस्पिटल, लाइफ केअर हॉस्पिटल या रुग्णालयांमध्ये स्पुटनिक लस उपलब्ध आहे.

हेही वाचा: कुल्फी विकणारा बनला पैठणी उद्योजक! जामदारीची पैठणी चेन्नईला

हेही वाचा: डाळींचे चढे भाव कोरोनाकाळात टिकून! व्यापाऱ्यांची नाराजी

loading image