
एसटी महामंडळाच्या भरतीला ब्रेक; पात्र ठरलेले उमेदवार प्रतिक्षेत
नाशिक : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (corona virus) यापूर्वी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा (exams) स्थगित झालेल्या आहेत. त्यातच महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन (Maharashtra State Road Transport) महामंडळाच्या भरती प्रक्रियेलाही (recruitment) कोरानामुळे पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. चालक-वाहकांच्या दोन हजार 682 पदांकरीता ही राज्यस्तरीय प्रक्रिया रखडली आहे. (ST recruitment break due to Corona)
भरती प्रक्रियेलाही पुन्हा एकदा ब्रेक
एसटी महामंडळाची भरती प्रक्रिया वर्षभरातून दुसर्यांना प्रभावित झाली आहे. यामुळे उमेदवारांकडून मनस्ताप व्यक्त होतो आहे. खर्च नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी निवड झालेल्या विविध संवर्गांतील प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण, अंतिम निवड प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली होती. यात नाशिकचे 112, परभणी 178, औरंगाबाद 113, अमरावती 87, बुलढाणा 401, धुळे 254, जळगाव 173, सोलापूर 342, सांगली 105, कोल्हापूर 207, नागपूर 232, भंडारा 50 अशा संख्येने चालक-वाहकांचा समावेश होता.
हेही वाचा: 22 जणांच्या मोक्कावर एकत्रच शिक्कामोर्तब; दहा वर्षात पहिल्यांदाच कारवाई!
चालक-वाहक प्रतिक्षेत
2020 मध्ये परीस्थिती पूर्वपदावर येत असतांना महामंडळाची सेवा सुरळीत झाले होते. त्यामुळे भरती प्रक्रियेवरील स्थगिती यावर्षी फेब्रुवारीत उठविली होती. किमान आता तरी गती मिळेल, अशी उमेदवारांना आस लागून होती. परंतु या दरम्यान कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढल्याने ही प्रक्रिया पुन्हा एकदा प्रभावित झाली आहे. यातून प्रशिक्षण पूर्ण झालेल्या व अंतिम चाचणी राहिलेल्या 472 चालक-वाहक. तसेच निवड पूर्ण होऊन प्रशिक्षण सुरू होणारे 2 हजार 210 चालक-वाहक आस लाऊन बसले आहेत.
हेही वाचा: रमजान ईदमुळे दुधाच्या दरांत उसळी; तरीही मागणीत वाढ
राज्यभरातून 215 महिलांचा समावेश
या प्रक्रियेंतर्गत महामंडळात 215 महिला चालक-वाहक भरती होणार आहेत. यात सर्वसाधारण क्षेत्रातील 194 आणि आदिवासी बहुल भागातील 21 महिलांचा समावेश आहे. या महिलांचे प्रशिक्षण चार महिन्यांपूर्वी सुरु झालेले आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वाहन चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करत या महिला कर्मचारी एसटी महामंडळाच्या सेवेत दाखल होतील.
Web Title: St Recruitment Break Due To Corona Nashik Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..