ST कर्मचाऱ्याची रेल्वेसमोर आत्महत्या; खिशात सापडली सुसाईड नोट

st strike update 1774 st running inconvenience rural areas Maharashtra State Transport Corporation
st strike update 1774 st running inconvenience rural areas Maharashtra State Transport CorporationFile Photo

आर्थिक परिस्‍थीती बिकट असल्‍याने उचलले पाऊल; संपादरम्‍यान जिल्‍ह्यातील तिसरा बळी

जळगाव : चार महिन्‍यांपासून सुरू असलेल्‍या एसटी कर्मचारी संप अजूनही मिटलेला नाही. या संपाचा एसटीतील आणखी एका कर्मचारीचा बळी गेला आहे. जळगावात हा प्रकार झाला असून चालकाने रेल्वेखाली स्‍वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना सकाळी घडली.

st strike update 1774 st running inconvenience rural areas Maharashtra State Transport Corporation
नाशिक औष्णिक वीज केंद्राची निर्मिती शून्यावर

राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या जळगाव विभागातील यावल आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्‍या शिवाजी पंडित पाटील (वय ४५) यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. परिवहन महामंडळातील कर्मचारींच्‍या संपादरम्‍यान आजची आत्‍महत्‍या ही राज्यातील ११४ वी तर जळगाव जिल्ह्यातील तिसरा बळी गेला आहे.

गँगमनच्‍या निदर्शनास आल्‍यानंतर घटना उघड

जळगाव शहरातील शिवाजीनगर स्‍मशानभुमी समोरील खांबा क्रमांक ४२०/२९/अ डाऊन लाईनवर आज सकाळी १० वाजेपुर्वी रेल्वेखाली आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना साडेदहाच्‍या सुमारास गँगमनच्या निदर्शनास आली. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे हवालदार करुणासागर जाधव व आरपीएफचे सुरेश मीना हे पोहचल्यानंतर पुढील कार्यवाहीला सुरुवात झाली.

st strike update 1774 st running inconvenience rural areas Maharashtra State Transport Corporation
खळबळजनक! नाशिकमध्ये बंद गाळ्यात सापडले मानवी अवयव

खिशात सापडली सुसाईड नोट

मृतदेहाचे खिसे तपासले असता खिशात एक डायरी मिळून आली. डायरीत असलेले ओळखपत्र आणि सुसाईड नोट वरून मृताची ओळख पटली. माझी मनस्थिती खराब असल्याने मी टोकाचे पाऊल उचलत आहे. माझ्या आत्महत्येशी माझ्या परिवाराचा काहीही संबंध नाही; असा उल्लेख सुसाईड नोटमध्‍ये केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com