Nashik Crime News : ट्रान्सपोर्टचा चोरलेला माल धुळ्यातून जप्त; आयशर चालकासह एकाचा शोध सुरू

Seized Goods
Seized Goodsesakal

नाशिक : पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डच्या गेटवरून ट्रान्सपोर्टचा माल घेऊन आलेला आयशर ट्रक मालासह गेल्या शनिवारी (ता.१८) चोरीला गेला असता, पंचवटी पोलिसांनी शिताफीने गुन्ह्याचा शोध लावत धुळ्यातून ४ लाख ४६ हजार ७८८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयित ट्रक चालक व त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

शरदचंद्र पवार मार्केट यार्ड येथील ट्रान्सपोर्ट मालक नैतिक महेश कातीरा यांनी इंदौरवरून ट्रान्सपोर्टद्वारे माल मागविला होता. त्यानुसार गेल्या शनिवारी (ता. १८) रात्री आयशर ट्रक मार्केट यार्डच्या गेटबाहेर आला होता.

मात्र संशयित ट्रकचालक हितेश नानजीभाई पटेल याने सदरचा ट्रक ४ लाख ८२ हजार २९९ रुपयांच्या मालासह पळवून नेला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल झाला.

सदरील गुन्ह्याचा तपास गुन्हेशोध पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार व त्यांचे पथक करीत होते. त्यावेळी त्यांना सदरचा आयशर ट्रक संशयित पटेल याने त्याचा धुळ्यातील साथीदार विशाल वाघ याच्या मदतीने चोरून नेला.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Seized Goods
Nashik Crime News :...अन् चालकानेच कार लांबविली

ट्रकमधील माल विक्रीसाठी धुळ्यातील अंबिकानगरमध्ये असल्याची गोपनीय खबर मिळाली होती. एक पथक तात्काळ धुळ्यात पोहोचले आणि चोरलेल्या मालापैकी तुपाचे डबे, मेडीसीन बॉक्स, सायकलीचे पार्ट, धुप बॉक्स, सायकल ट्युब बॉक्स, हार्डवेअर बॉक्स असा ४ लाख ४६ हजार ७८८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर, संशयित पटेल व वाघ दोघेही पसार झाले असून, पंचवटी पोलिस दोघांचा शोध घेत आहेत.

सदरची कामगिरी सहायक निरीक्षक सत्यवान पवार, विलास पडोळकर, अशोक काकड, सागर कुलकर्णी, दीपक नाईक, अनिल गुंबाडे, कैलास शिंदे, महेश नांदुर्डीकर, निलेश भोईर, राकेश शिंदे, गोरक्ष साबळे, घनशाम महाले, श्रीकांत साळवे, नितीन पवार, अविनाश थेटे, कुणाल पचलोरे, वैभाव परदेशी, कल्पेश जाधव, अंकुश काळे, नारायण गवळी, गणेश शिकारे, कैलास सोनवणे यांनी बजावली.

Seized Goods
Nashik Crime News : घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार; चोरीछुप्याने वाहनांमध्ये भरला जातो गॅस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com