esakal | मालेगावमध्ये संचारबंदीची होणार कठोर अंमलबजावणी..अतिरिक्त पोलिस, एसआरपी दाखल 

बोलून बातमी शोधा

malegaon sancharbandi.jpg

संचारबंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा दाखल झाला आहे. सोमवारी (ता. 13) रात्री उशिरा धुळे, नंदुरबार, मुंबई, जळगाव येथील कर्मचारी व पोलिस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांसह साडेतीनशे अतिरिक्त पोलिस, तसेच हिंगोली, औरंगाबाद, धुळे येथील राज्य राखीव दलाची तुकडी बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाली. मध्यरात्रीच पोलिसांनी बंदोबस्ताच्या ठिकाणांचे वाटप करून विविध भागांत रवाना करण्यात आले. त्यांच्या निवासव्यवस्थेसाठी पोलिस प्रशासनाने शहरातील दहापेक्षा अधिक मंगल कार्यालये ताब्यात घेतली आहेत.

मालेगावमध्ये संचारबंदीची होणार कठोर अंमलबजावणी..अतिरिक्त पोलिस, एसआरपी दाखल 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : कोरोना संसर्गाचा अटकाव व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर शहरात संचारबंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा दाखल झाला आहे. सोमवारी (ता. 13) रात्री उशिरा धुळे, नंदुरबार, मुंबई, जळगाव येथील कर्मचारी व पोलिस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांसह साडेतीनशे अतिरिक्त पोलिस, तसेच हिंगोली, औरंगाबाद, धुळे येथील राज्य राखीव दलाची तुकडी बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाली. मध्यरात्रीच पोलिसांनी बंदोबस्ताच्या ठिकाणांचे वाटप करून विविध भागांत रवाना करण्यात आले. त्यांच्या निवासव्यवस्थेसाठी पोलिस प्रशासनाने शहरातील दहापेक्षा अधिक मंगल कार्यालये ताब्यात घेतली आहेत. एका मंगल कार्यालयात 50 जण याप्रमाणे निवासव्यवस्थेचे नियोजन आहे. 

पाणी उपलब्ध नसल्याने अनेकांची नाराजी
येथील सामान्य रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या परिचारिका, सेविका, मदतनीस आदींची रुग्णालय आवारातील नर्सिंग कॉलेज होस्टेलमध्ये सोय करण्यात आली आहे. येथे चाळीसपेक्षा अधिक नर्स व कर्मचारी वास्तव्यास आहेत. त्याशिवाय कोरोना कक्षात काम करणाऱ्यांची येथेच सोय करण्यात आली आहे. येथील पवन टिबडेवाल परिवारातर्फे तीन दिवसांपासून रोज 50 डबे पुरविले जात आहेत. त्यामुळे भोजनाची सोय झाली असली, तरी पिण्यासाठी व अंघोळीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य विभाग वा महापालिका प्रशासनाने येथे पिण्याच्या पाण्याची सोय करणे आवश्‍यक आहे.  

हेही वाचा > मुलाला उच्चशिक्षित करण्याची 'त्यांची' इच्छा अपूर्णच...काळ असा आला की...मुलगाच  

हेही वाचा > कर्जाच्या बोजाखाली 'त्याचा' जीव गुदमरला..अखेर तरुण शेतकऱ्याने शेवटचा निर्णय घेतला