ST STRIKE | एसटी प्रशासनाची कठोर भूमिका, नाशिकमध्ये 9 कर्मचाऱ्यांची केली सेवासमाप्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st

ST प्रशासनाची कठोर भूमिका, 9 कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती | Nashik

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : राज्‍यस्‍तरावरील एसटी कर्मचारी आंदोलनाची तीव्रता जिल्ह्यातही कायम आहे. अशात नोटीस बजावलेल्‍या नऊ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आल्‍याची माहिती मिळत आहे. आंदोलनकर्त्यांवर कारवाईबाबत नरमाईची भूमिका काही दिवसांपूर्वी प्रशासनाने घेतली होती. परंतु, आता प्रशासन पुन्‍हा कठोर भूमिकेत आल्‍याचे बोलले जात आहे.

नऊ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती

जिल्‍हास्‍तरावर एसटी कर्मचाऱ्यांच्‍या संपामुळे महामंडळाची सेवा ठप्प आहे. अशात खासगी शिवशाही बसगाड्या काही प्रमाणात प्रवाशांसाठी आधार ठरत आहेत. आंदोलन सुरू झाल्‍यानंतर नोटिसा बजावताना प्रशासनामार्फत कर्मचाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करण्यात आला होता. याअंतर्गत ४१ रोजंदारी कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्ती का करण्यात येऊ नये, यासंदर्भात विचारणा करणारी नोटीस बजावली होती. यापैकी नऊ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. तर नियमित कर्मचाऱ्यांपैकी १५८ जणांवर आत्तापर्यंत निलंबनाची कारवाई केली असल्‍याची माहिती मिळत आहे. आक्रमक झालेले एसटी प्रशासन येत्‍या काही दिवसांत आणखी काही जणांवर सेवासमाप्तीची कारवाई करू शकते, असे सांगितले जात आहे.

हेही वाचा: देशमुख आणि सिंह यांच्यातील वादावर 'SC' ने व्यक्त केली चिंता

आंदोलनकर्ते भूमिकेवर ठाम

यापूर्वी वारंवार आवाहन करूनही आंदोलनकर्त्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्‍याची स्‍थिती आहे. अशात निलंबन, नोटिसांच्‍या माध्यमातून दबाव निर्माण करण्याचाही प्रयत्‍न बघायला मिळाला. परंतु आंदोलकर्ते आपल्‍या भूमिकेवर ठाम असल्‍याचे चित्र जिल्‍हा पातळीवर बघायला मिळत आहे. यामुळे एन. डी. पटेल मार्गावरील महामंडळाच्‍या कार्यालयाच्‍या प्रवेशद्वारावर दिवसभर आंदोलकर्ते कर्मचाऱ्यांचा वावर बघायला मिळत आहे.

हेही वाचा: 'त्या प्रकरणात मी फक्त प्यादा,' वाझेचा चौकशी समितीसमोर खुलासा

loading image
go to top