esakal | आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी कोरोना रुग्णांच्या सेवेत
sakal

बोलून बातमी शोधा

आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी कोरोना रुग्णांच्या सेवेत

ज्या कुटुंबातील एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्यास कुटुंबातील इतर सदस्य बाधित होऊ नये, अशा सदस्याला हॉटेलमध्ये विलगीकरण करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी कोरोना रुग्णांच्या सेवेत

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाशिक : आयुर्वेदिक महाविद्यालयाचे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी कोरोना रुग्णांची सेवा बजावत आहेत. श्री गुरुजी रुग्णालय, आयुर्वेद सेवा संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातर्फे कोरोना रुग्णांसाठी निःशुल्क सेवा बजावण्याचे कार्य शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये जवळपास ५० खाटांच्या माध्यमातून सुरू केले आहे.

हेही वाचा: पोलिसांच्या मनमानीविरोधात व्यापाऱ्यांचा आजपासून बंद

याठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड जरी नसले तरी येथील श्री गुरुजी रुग्णालय, आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टरांमुळे कोरोना रुग्णांवर उपचार होत आहेत. ज्या कुटुंबातील एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्यास कुटुंबातील इतर सदस्य बाधित होऊ नये, अशा सदस्याला हॉटेलमध्ये विलगीकरण करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे इतर सदस्यांचा कोरोना सुपर स्प्रेडरपासून बचाव होण्यास मदत होत आहे. हॉटेलमध्ये कोरोना रुग्णांसाठी तीन डॉक्टरांच्या निगराणीत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे ३० विद्यार्थी, २२ स्वयंसेवक सेवा देत आहेत. रोज आयुर्वेदिक काढा, दोन वेळेचे जेवण कोरोनाबाधितांना दिले जात आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना श्री. गुरुजी रुग्णालयात प्रशिक्षित करण्यात आले आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना हॉटेलमध्येच राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता चार विद्यार्थ्यांची टीम सेवा बजावत असून, रोटेशन पद्धतीने असे ३० विद्यार्थी सेवा बजावतील. आठवड्यानंतर आयुर्वेद महाविद्यालयातील दुसरी टीम सेवा बजावणार आहे.

हेही वाचा: खासदारांची सात हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन गेली कुठे? भाजपचा शिवसेनेवर निशाणा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून वर्षभरापासून कोरोना रुग्णांसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. स्वयंसेवकांच्या माध्यमातून ५० बेड सुरू करण्यात आले आहेत. यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाची मदत लाभत असून, १८ रुग्णांवर कोरोना प्रोटोकॉलनुसार उपचार निःशुल्क सुरू आहेत.

- मंदार ओलतीकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

श्री गुरुजी रुग्णालय, आयुर्वेद सेवा संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विलगीकरण कक्ष स्थापन केले आहे. ज्या रुग्णांचे घर लहान आहे, त्यात तो बाधित आढळला विलगीकरणाची सोय नसेल, तर सुपर स्प्रेडर ठरू नये, यासाठी सेंटर सुरू करण्यात आले आहे.

- डॉ. विजय मालपाठक, श्री गुरुजी रुग्णालय

श्री गुरुजी रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार करताना कोणती काळजी घ्यावी, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयातील ३० विद्यार्थी सेवा बजावणार आहेत. आता चार विद्यार्थ्यांची टीम गेल्या रविवारपासून कोरोना रुग्णांची सेवा करत आहे.

- डॉ. अक्षदा गायकवाड, आयुर्वेद महाविद्यालय

loading image
go to top