Subhash Lamba Statement : खासगीकरणाच्या नावाने देशाच्या संपत्तींची विक्री

Subhash Lamba Statement
Subhash Lamba Statementesakal

नाशिक : देशात लष्करातील 'अग्निविर' सारख्या कंत्राटी नोकऱ्या आगामी काळात सर्व शासकीय कार्यालयात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता केंद्र शासन विरोधात कामगार व इतर संघटना लढा देत आहेत. या लढ्यात सर्व सामान्य नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनी केले.

केंद्र शासन खासगीकरणाच्या नावावर देशाची ७० वर्षाची संपत्ती विक्री करीत आहे. रिझर्व बँकेचा फंड देखील शासनाकडून विनाकारण वापरला जात असून, मोठया प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहेत. पंतप्रधान मोदी देशवासियांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत विचारमंथन करून ८ डिसेंबर २०१२ रोजी दिल्ली येथे ताल कटोरा स्टेडियम येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रीय परिषदेत धोरण ठरवविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबाद रोडवरील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम येथे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्यव्यापी अधिवेशनास शनिवारी (ता.19) सुरूवात झाली. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लांबा यांच्या हस्ते अधिवेशनाचे उदघाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. (Subhash Lamba Statement Selling country wealth in name of privatization Nashik News)

Subhash Lamba Statement
Nashik : उपनगरला वृक्षतोड प्रकरणी 14 लाख 85 हजाराचा दंड

अधिवेशनाचे खासदार हेमंत गोडसे, उन्मेश पाटील, अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे महासचिव ए. श्रीकुमार, आमदार सीमा हिरे, अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास काटकर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे, सचिव अविनाश दौंड, महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, सरचिटणीस अशोक थूल, प्रभारी सरचिटणीस संजय महाळंकर, राज्य उपाध्यक्ष शोभा खैरनार, विभागीय उपाध्यक्ष कैलास वाघचौरे, नाशिक जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, सरचिटणीस महेंद्र पवार, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील आदी उपस्थित होते. सकाळी कर्मचा-यांची रॅली काढण्यात आली.

अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेतला गेला असून आता त्यावर निर्णायक मार्ग काढण्यात येणार असल्याचेही अध्यक्ष लांबा यांनी सांगितले. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनासाठी राज्यातील जवळपास बाराशे प्रतिनिधी उपस्थित असून यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही सहभाग लक्षणीय आहे.

खासदार पाटील, गोडसे, आमदार सीमा हिरे यांनी संघटनेचे ठराव शासनदरबारी मांडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मध्यवर्ती संघटनेचे अविनाश दौड यांनी सांगितले, की संघटनेसाठी स्वर्गीय र. ग. कर्णिक यांचे मोठे योगदान आहे. लीडर आणि केडर दोन्ही घटक महत्वाचे असल्याचे सांगितले. अधिवेशनात पहिल्या दिवशी महिलांचे विशेष चर्चासत्र आयोजीत करण्यात आले होते. कामाच्या जागी येणाऱ्या समस्या, संरक्षण, हक्क अशा अनेक विषयांवर उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी आपली मते मांडली. या अधिवेशानात ४४ ठरावावर चर्चा कऱण्यात आली. रविवारी (ता. २०) अधिवेशनाच्या समारोपाला हे ठराव संमत केले जाणार आहे.

Subhash Lamba Statement
Nashik Crime News : खंडणी वसुली प्रकरणी एकाला अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com