Success Story : 4 महिन्यांच्या मुलीपासून दूर राहणाऱ्या 'हिरकणी'चे स्वप्न झाले पूर्ण; दीपालीची गगनभरारी

police
policeesakal

Success Story : हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेली या काव्यपंक्तीची ज्योत घेऊन धावणाऱ्याच्या जीवनात अंधकार येण्याची शक्यता कमी आहे. अश्रूंची फुले करण्याची ताकद या कवितेत सामावलेली आहे.

ताकद, स्फूर्ती, आणि प्रेरणा काठोकाठ भरलेली ही कविता निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील एका हिरकणीने प्रेरक मानली अन्‌ त्या जोरावर मुंबई पोलिस दलात पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

चार महिन्यांच्या तान्ह्या मुलीला सासूच्या पदरी देऊन भरती होण्यासाठी जाणाऱ्या दीपाली पगार - गाडे यांची मुंबई पोलिस अंतिम यादीत निवड झाली आहे. (Success Story dreams come true dipali join mumbai police nashik news)

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील बाबासाहेब पगार यांची कन्या असलेल्या दीपाली यांचा विवाह गोंदेगाव (ता.निफाड) येथील रावसाहेब गाडे यांचा मुलगा अमोल यांचेशी २०२० मध्ये विवाह झाला.

विवाहापूर्वी विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेत असतानाच दीपालीने पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणास सुरवात केली होती. दोघांच्या संसारात अन्वी आली. एकीकडे स्वप्न आणि दुसरीकडे खुणावणारी पोलिस वर्दी यांच्या द्वंद्वात असलेल्या दीपालीच्या पंखात अमोलने बळ भरले. अन्‌ भरती पूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी दीपालीने थेट पुणे गाठले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

police
Success Story: रात्रीचा दिवस करत केली अंध वडिलांची स्वप्नपूर्ती! राजापूरचा योगेश्वर MPSCमध्ये राज्यात 15वा

एकीकडे अंतःकरणात पाझर फोडणारी हिरकणी आणि दुसरीकडे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारी तरुणी अशा दोन्ही आघाड्यांवर दीपाली झुंजत होती. शेतीवर अवलंबून असलेल्या गाडे कुटुंबाने तडजोड करत तर कधी मोलमजुरी करत दीपालीचा खर्च भागविला.

या कष्टांची जाणीव ठेवून दीपालीने देखील मैदानी कसरत आणि लेखी परीक्षेचा जोरदार सराव केला. मुंबई पोलिस भरतीमध्ये जिवाचे रान करत तिने झोकून दिले.

police
Success Story : सहाय्यक नगर रचनाकारच्या परीक्षेत लखमापूरचा हर्शल खैरनार राज्यात प्रथम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com