Success Story: शेतकरी पुत्राची दुसऱ्यांदा अधिकारीपदाला गवसणी; ओझरच्या भूमिपुत्राची सहकार अधिकारीपदी निवड

Suraj vanle
Suraj vanleesakal

ओझर : येथील लक्ष्मीनगरमधील शेतकरी कुटुंबातील तरुणाने दुसऱ्यांदा अधिकारीपदाला गवसणी घालत परिवारातील सदस्यांचे अश्रू पुसण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. (Success Story farmer son second time become an officer selection of of Ozar boy as Co operative Officer nashik)

राज्य सहकार व पणन विभागांतर्गत झालेल्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. त्यात येथील सूरज विठ्ठल वानले याने यश मिळवून थेट सहकार अधिकारी श्रेणी २ या पदाला गवसणी घातली.

सूरजचे वडील विठ्ठल वानले शेतकरी असून, शेतीचे उत्पन्न कमी होत असल्याने त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. आई गृहिणी आहे. जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या सूरजने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण विभागांतर्गत झालेल्या परीक्षेत लिपिकपद मिळविले होते.

विज्ञान शाखेतील पदवीधर असलेल्या सूरजने पदवी परीक्षेनंतरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला होता. येथील अभ्यासिकेत केलेल्या अभ्यासाच्या जोरावर पुण्यातील यशदा संस्थेची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला.

त्या संस्थेत एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्याचा फायदा त्याला पुढील परीक्षेत झाला. एमपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेतही वनसेवा परीक्षेच्या मुलाखतीपर्यंत सूरजने मजल मारली होती. अवघ्या काही गुणावरून संधी हुकुली.

Suraj vanle
Success Story: सोनीसांगवीची श्रेया ठाकरे नौदलात ‘एअर इंजिनिअर'! जिद्द अन् चिकाटीने मिळविले यश

पोलिस उपनिरीक्षकपदाच्या २०२२ व २०२३ च्या मुख्य परीक्षेस पात्र असून, त्याचीही तयारी सूरज करीत आहे. नियमितपणे केलेला अभ्यास व जिद्दीने उभे राहुन कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या बळावर सहकार अधिकारीपदी विराजमान झाला.

निकाल समजताच कुटुंबातील सदस्यांनी व मित्र परिवाराने डीजेच्या तालावर सूरजची मिरवणूक काढली. औक्षण करताना उपस्थित सर्वांनीच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

"मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाले. मागे वळून बघितले, तर अंगावर काटा उभा राहतो. माझ्या यशात कुटुंबातील सदस्य, नातेवाईक व मित्र परिवारच्या पाठिंब्याची मोठी भूमिका आहे. स्पर्धा परीक्षांचे मृगजळ तयार झाले आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी यात स्वतः न अडकता कुणावरही अवलंबून न राहता आणि दुसऱ्या कुठल्याही यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या विजयाला बघून आपली तयारी करू नये. फक्त आणि फक्त स्वतः वर विश्वास ठेवावा. स्वतःला स्वतःची शंभर टक्के खात्री असेल, तर स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. स्पर्धा परीक्षेबाहेरही एक सुंदर जग आहे."-सूरज वानले, सहकार अधिकारी

Suraj vanle
Success Story Of Pravina : अडथळ्यांवर मात करत ‘ती’ १९ व्या वर्षी सरपंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com