esakal | उड्डाणपुल प्रस्तावासंदर्भात सुधाकर बडगुजर यांचा गौप्यस्फोट, म्हणाले..
sakal

बोलून बातमी शोधा

Sudhakar Badgujar

उड्डाणपुल प्रस्तावासंदर्भात बडगुजर यांचा गौप्यस्फोट, म्हणाले..

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहरातील अकरा मिळकती बीओटीवर विकसित करण्यासाठी नियुक्त केलेल्या कन्सल्टन्सी वरून वाद निर्माण झाला असतानाच आता सिडकोतील त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीचा प्रस्ताव मागच्या दाराने मंजूर करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी यासंदर्भात एका बैठकीत धक्कादायक गौप्यस्फोट केला.

शहरातील वाहतुकीचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन सत्ताधारी भाजपच्या काळात दोन नवीन उड्डाणपूल मंजूर करण्यात आले. सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या या दोन्ही पुलांची किंमत असून एक पूल मायको सर्कल येथे वाय आकाराचा, तर दुसरा पूल त्रिमूर्ती चौक ते संभाजी चौक दरम्यान होणार आहे. या पुलाच्या कामावरून भाजप व शिवसेनेत आधीच वाद निर्माण झाले होते. महापौर सतीश कुलकर्णी यांनी विकासकामांसाठी निधी हवा असल्याने उड्डाणपुलांना विरोध केला होता. त्यानंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख व नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी विकासाचे काम थांबवून दाखवा, असा इशारा देत भाजपविरुद्ध दंड थोपटले होते.

हेही वाचा: मालेगावात मित्रपक्षांत ठिणगी; शिवसेनेची कॉंग्रेस कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

सिडकोतील भाजपच्या काही नगरसेवकांनीदेखील बडगुजर यांची बाजू घेत उड्डाणपूल व्हावा, अशी ठाम भूमिका घेतली होती. कालांतराने उड्डाणपुलाचा वाद शमल्यानंतर पुलासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंटच्या ग्रेड वाढविण्याच्या मुद्द्यावरून तब्बल ४४ कोटी रुपये वाढीव देण्याचे पत्र संबंधित कंपनीकडून बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आले. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी पवई आयआयटीचा सल्ला घेतल्यानंतरच वाढीव रकमेबाबत विचार करता येईल, असे स्पष्टीकरण दिल्यानंतर ४४ कोटी वाढीचा प्रस्ताव बारगळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पुलांची गुणवत्ता वाढविण्याच्या नावाखाली पुन्हा एक बैठक झाली. त्यावेळी पुलाचे प्राकलन तयार करताना ग्रेडचा विचार केला आला नाही का, असा विषय निघाला. त्यावेळेस बडगुजर यांनी ज्या कन्सल्टिंग एजन्सी नियुक्त केली होती. त्या कन्सल्टन्सीला काम देण्याचा प्रस्ताव मागच्या दाराने मंजूर करण्यात आल्याचा गौप्यस्फोट केल्याने उड्डाणपुलाच्या कामाला आणखीन एक वादाची किनार मिळाली आहे.

हेही वाचा: नाशिक : सापळा रचत पकडले 3500 किलो गोमांस

loading image
go to top