Summer Drinks : उन्हाळ्याच्या काहिलीने शीतपेयांना मागणी वाढली

Summer Drinks
Summer Drinksesakal

Summer Drinks : निफाड तालुका व परिसरात गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले होते. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाल्याने दुपारच्यावेळी अघोषित संचारबंदी दिसून येत आहे.

उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे उन्हाळ्यात शहरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते, त्यामुळे शरीराला ऊर्जा व तहान भागविण्यासाठी लिंबू सरबत, उसाचा रस, सरबत आदींसह दुग्धजन्य थंडपेयांची मागणी वाढली आहे.

त्यामुळे शहरातील रहदारीच्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील मुख्य व विविध चौकांत शीतपेयांची दुकाने थाटल्याचे चित्र दिसून येत आहे. (Summer Drinks With heat of summer demand for soft drinks has increased nashik news)

दिवसभर उन्हाची काहिली व उकाड्याचे प्रमाण यामुळे उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. यामुळे लोकांतून विविध प्रकारच्या थंड व शीतपेयांची मागणी वाढली आहे. सध्या धार्मिक कार्यक्रम, विवाह सोहळे व इतर कार्यक्रमांसाठी बाहेरगावी जाणाऱ्यांनी उसाच्या रसाला पसंती दिली असल्याचे दिसून येत आहे.

तापमानामुळे विवाहसमारंभात ताक, मठ्ठा भोजनातील अविभाज्य घटक झाला आहे. दही, तूप, ताक, लोणी आदींची विक्री वाढली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Summer Drinks
Bharat Dighole : नाफेडकडून कांदा खरेदी सुरू होणे आवश्यक : भारत दिघोळे

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ वधारली

अतिउष्णतेमुळे रस्ते, बाजारपेठा निर्मनुष्य झालेल्या असल्या तरी फ्रिज, कुलर, एसी, पंखे आदी वस्तूंची मागणी वाढू लागलेली आहे.

त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांमध्ये सकाळ आणि सायंकाळच्या वेळेस गर्दी बघावयास मिळत आहे. तसेच, ही साधने दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांनाही फ्रिज, कुलर दुरुस्तीचे कामे मिळू लागली आहेत.

"उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते,त्याचा परिणाम थेट शरीरावर होतो. यासाठी जीवनसत्त्व व मूलद्रव्ये युक्त पदार्थांसह नारळ पाणी, आवळा, लिंबू पाणी यांचे सेवन करावे. लहान मुले व वृद्ध नागरिकांनी शरीरात पाण्याचे प्रमाण समतोल राहण्यासाठी जास्त पाणी प्यावे. फ्रीजमधील थंड पाणी घातक असून घशाला विकार होऊ शकतात."- डॉ. किरण पाटील, देवगाव.

Summer Drinks
Nashik News : उगाव रेल्वे स्थानकावर मेमू रेल्वे थांबेना; उगावकरांचा संताप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com