उन्हाचा तडाखा वाढताच लिंबू कडाडला; 5 वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक दर वाढ

summer start price of lemon increases
summer start price of lemon increasesesakal

मालेगाव (जि. नाशिक) : उन्हाचा तडाखा वाढताच बाजारात लिंबूच्या भावाने उसळी घेतली आहे. भाजीपाल्या पाठोपाठ आता लिंबूही महाग झाला आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानांवर दहा रुपये नगाने लिंबू मिळत आहे. येथे दीडशे ते १७० रुपये किलोने घाऊक बाजारात लिंबू मिळत आहे. भाववाढीमुळे लिंबू सरबतचे दरही आता वाढण्याची शक्यता आहे.

भाजीपालाही कडाडला

बाजारात भाजीपाला कडाडला आहे. गवार, शेवगा, लवंगी मिरची, कैरी, जाड मिरची, गिलके, दोडके, भेंडी, काकडी, कारली यांचे भाव गगनाला भिडले आहे. यापाठोपाठ लिंबूचे दरही अचानक वाढले. येथील भाजीपाला मार्केटमध्ये रोज लिंबूचे १०० ते १५० कॅरेट माल विक्रीसाठी येतो. लिंबूच्या एका कॅरेटची किंमत २ हजार ४०० ते अडीच हजार रुपयापर्यंत आहे. दोन वर्षापुर्वी लिंबुच्या एका कॅरेटची किंमत हजार ते बाराशे रुपयांपर्यंत होती. कोरोना, लॉकडाउनमध्ये लिंबूला मागणी कमी होती. सध्या मागणी आणि उपलब्ध माल यामध्ये मोठी तफावत असल्याने लिंबूचे भाव कडाडल्याचे व्यावसायिकांचे मत आहे.
येथील भाजी बाजारात चाळीसगाव तालुक्यातून तसेच, दाभाडी परिसरातील माल मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे. येथून सटाणा, कळवण, देवळा, नामपूर, ताहाराबाद, येवला, नांदगाव व तालुक्यातील बाजारात माल विक्रीला जात असल्याचे येथील लिंबूचे घाऊक व्यापारी सुनील बाने व कृष्णा बाने यांनी सांगितले.

summer start price of lemon increases
SBI ने व्याजदर वाढवून ग्राहकांना दिलं गिफ्ट

पाच वर्षांच्या तुलनेत लिंबूची सर्वाधिक दर वाढ

सध्या तापमानात वाढ झाल्याने नागरिकांचा शितपेयांकडे कल वाढला आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला व गल्ली- मोहल्ल्यांमध्ये शितपेयांची अनेक दुकाने लागली आहेत. लिंबूचा वापर मोठ्या प्रमाणात रसवंती, लिंबु सिकंजी, सोडा, लिंबू सरबत आदींमध्ये होत आहे. मुस्लीम बांधवांचे रमजान पर्व ३ एप्रिलपासून सुरु होणार आहे. त्यामुळे येथे लिंबूची मागणी वाढेल. कॅरेटच्या किमती ५०० ते ६०० रुपयापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत लिंबूच्या सर्वाधिक दर वाढ प्रथमच पाहायला मिळत आहे. अपेक्षित भाव मिळत असल्याने लिंबू उत्पादकांमध्ये समाधानकारक वातावरण आहे.

summer start price of lemon increases
तप्त उन्‍हाचे सोसवे ना चटके; उकाड्याने नाशिककर हैराण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com