esakal | काय? नाशिकमध्ये पुन्हा कोरोनाचा संशयित रुग्ण...
sakal

बोलून बातमी शोधा

corona 1.jpg

दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये एका तरुणामध्येही करोनाची लक्षणं आढळली होती. मात्र, त्याच्या रक्ताच्या रिपोर्टमध्ये त्याला करोनाची लागण नसल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा सुस्कारा सोडला होता. मात्र, त्यानंतर लगेचच नाशिकमध्येच दुसरा संशयित आढळल्याने खळबळ उडाली आहे.

काय? नाशिकमध्ये पुन्हा कोरोनाचा संशयित रुग्ण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक: दोन दिवसांपूर्वीच नाशिकमधील एका तरुणाचे करोना व्हायरसचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलेला असतानाच (ता.३)पुन्हा नाशिकमध्ये करोनाचा संशयित रुग्ण आढळल्याची बातमी मिळाली. अन् कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. सध्या या रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.देशात नवी दिल्ली, तेलंगणा आणि राजस्थान येथेही करोनाचे संशयित रुग्ण आढळले आहेत.

तरुणामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं

नाशिकमधील या तरुणामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली. सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेताना त्रास, डोकेदुखी आदी लक्षणं त्याच्यात आढळल्याने त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर या रुग्णाला करोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या विशेष कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याचे रक्ताचे नमूने घेण्यात आले असून पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याला करोनाची लागण झाली की नाही, याची माहिती मिळणार आहे.

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

दुसरा संशयित आढळल्याने खळबळ
दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये एका तरुणामध्येही करोनाची लक्षणं आढळली होती. मात्र, त्याच्या रक्ताच्या रिपोर्टमध्ये त्याला करोनाची लागण नसल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा सुस्कारा सोडला होता. मात्र, त्यानंतर लगेचच नाशिकमध्येच दुसरा संशयित आढळल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा > लष्करी जवानाकडून जेव्हा पत्नीची हत्या होते तेव्हा...धक्कादायक घटना!