Nashik News : निलंबित ZP कर्मचाऱ्यास पदोन्नती देण्याचा घाट!

ZP Nashik latest marathi news
ZP Nashik latest marathi newsesakal

नाशिक : जिल्हा परिषदेने निलंबित केलेल्या बांधकाम विभाग दोनमधील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गायत्री पवार यांना पुन्हा बांधकाम विभागात पुनर्स्थापना देण्याचा डाव उधळल्यानंतर आता सदर पवार यांना पदोन्नती देण्याचा घाट घातला जात असल्याचे वृत्त आहे.

स्थापत्य अभियांत्रिकीतून कनिष्ठ अभियंता अशा पदोन्नत्या केल्या जात असून यात पवार यांच्या नावाचा समावेश आहे. या पदोन्नतीस बांधकाम विभागाने फाईलवर स्पष्टपणे नकार दर्शविला असतानाही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दिशाभूल करत त्यांना पदोन्नती देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. (Suspended ZP employee on verge of promotion Nashik News)

जयेश अहिरे यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गायत्री पवार विरोधात तक्रार दाखल केली होती. त्याअनुषगांने पवार यांची चौकशी केली असता त्यांना निलंबित करत दणका दिला होता. त्यावेळी पवार यांची चांदवड मुख्यालयात रवानगी केली होती.

या कारवाईला तीन महिने पूर्ण झाल्याने पवार यांच्याकडून गत महिन्यात पुर्नस्थापनेसाठी प्रयत्न झाले. प्रशासनाने त्यांना बांधकाम विभाग एक किंवा दोनमध्ये त्यांना रुजू करून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.

मात्र, त्यास विविध पातळीवरून विरोध झाल्याने पवार यांनी पुनर्स्थापना न देता प्रतिक्षेत ठेवण्यात आले होते. पवार यांना पुनर्स्थापना देता येत नसल्याने त्यांना पदोन्नती देऊन संबंधितांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यासाठी बांधकाम विभागाकडून फाइल देखील फिरली.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

ZP Nashik latest marathi news
Nashik News : माध्यमिक शिक्षक पतपेढीत 2 कोटींचा गैरव्यवहार! मनोज पाटलांसह पॅनलचा आरोप

यात बांधकाम विभागाने पवार पदोन्नतीस अपात्र असल्याचे स्पष्ट अभिप्राय देखील नोंदविला असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर देखील संबंधित महिला कर्मचारी यांना पदोन्नती देण्याची फाइल एका वरिष्ठ अधिका-यांना सादर केली असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे.

पदोन्नती देऊ नये

"बांधकाम विभागात काम करत असलेल्या गायत्री पवार यांच्या विरोधात तक्रारी असताना त्याची चौकशी झाली नाही. मात्र, त्यांची पुनर्स्थापना देण्याचा प्रयत्न झाला हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता, त्यांना पदोन्नती दिली जात आहे. निलंबित कर्मचाऱ्यास पदोन्नती देणे चुकीचे आहे. त्यांना पदोन्नती दिल्यास संघटनेच्यावतीने आंदोलन केले जाईल."

- दत्तु बोडके, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख, प्रहार संघटना.

ZP Nashik latest marathi news
SAKAL Impact : कोळदा- खेतिया रस्ता; अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com