Nashik News : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत आज जिल्ह्यात श्रमदान मोहीम

Nashik ZP News
Nashik ZP News esakal

Nashik News : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींत ‘स्वच्छता ही सेवा’ ही राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. रविवारी (ता. १७) जिल्ह्यात महाश्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

श्रीमती मित्तल स्वतः गोवर्धन (ता. नाशिक) येथील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींत ही मोहीम राबविली जाईल. यंदा या मोहिमेची कचरामुक्त भारत ही संकल्पना आहे. (Swachhata Hi Seva campaign in district today nashik news)

गावात स्वच्छताविषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. शनिवारी (ता. १६) अनेक गावांमध्ये गृहभेटींचे आयोजन करून अभियानास सुरवात करण्यात आली. रविवारी जिल्ह्यात श्रमदान मोहीम राबविण्यात येणार असून, यात धार्मिक स्थळ, शासकीय इमारती, बसस्थानक परिसरात स्वच्छता केली जाणार आहे.

याबाबत सर्व तालुक्यांनी नियोजन केले. श्रीमती मित्तल यांनी या अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी होऊन अभियान प्रभावीपणे राबविण्याचे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावात शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik ZP News
Aditya Thackeray Daura: दुष्काळी स्थिती मांडताना शेतकरी बांधवांचे अश्रू अनावर; आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद

या अभियानात गावातील दृश्यमान स्वच्छता, कचराकुंड्या व विविध ठिकाणांची साफसफाई, कचरा स्रोतांच्या ठिकाणी सुका व ओला कचरा वेगळा करण्यासाठी जनजागृती करणे, प्लास्टिकसारखा अविघटनशील कचरा एकत्रित करून नियोजन करणे, पाणठळ्याजवळील परिसर स्वच्छ ठेवून सभोवताली वृक्षारोपण करणे, एकल प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करणे, स्वच्छतेची शपथ घेणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

शालेय स्तरावर रांगोळी स्पर्धा, कविता स्पर्धाही होतील, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी दिली.

Nashik ZP News
Nashik News: परिमंडळ दोनमध्ये पोलिसांचे कोम्बिंग; आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा दणका!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com