
Crime Alert : चाकू सह तडीपार संशयितास अटक
जुने नाशिक (जि. नाशिक) : भद्रकाली गुन्हे शोध पथकाने चाकूसह तडीपार संशयितास अटक केली. पोलिस कर्मचारी सागर निकुंभ यांना तडीपार संशयित खडकाळी सिग्नल परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. एस. व्ही. शेळके, एम. एच. ठेपणे, श्री. निकुंभ घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा परिषदेकडून खडकाळी सिग्नलच्या दिशेने संशयित येताना दिसला. त्यास ताब्यात घेत चौकशी केली. (Tadipar suspect arrested with knife Nashik Crime News)
हेही वाचा: वाहन तपासणीत 15 ते 40 रुपयांपर्यंत वाढ; महागाईमुळे सुधारित नवे दर लागू
सोहेल मोहिनोद्दीन शेख (२२, रा. गंजमाळ पंचशील नगर) असे नाव सांगितले. अधिक चौकशी केली असता, ११ जानेवारीला त्याला १ वर्षासाठी शहर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली. त्याच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा: सह्याद्री संवाद - ‘क्रिकेटने मला काय शिकविले?‘
Web Title: Tadipar Suspect Arrested With Knife Nashik Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..