Ramzan Eid | मालेगावात टेलर दुकाने हाऊसफुल

tailor shops Housefull in Malegaon Ramzan Eid
tailor shops Housefull in Malegaon Ramzan Eid esakal

मालेगाव : कोरोनामुळे सलग दोन वर्षे येथील मुस्लीम बांधवांनी साध्या पद्धतीने रमजान ईद (Ramzan Eid) साजरी केली. यावर्षी कोरोना निर्बंध शिथील झाले आहेत. उद्योग- व्यवसाय पुर्वपदावर आले आहेत. त्यामुळे रमजान पर्वात उत्साहाचे वातावरण आहे. रमजानसाठी कपडे खरेदीची लगबग सुरु झाली आहे. शहरातील मुस्लीमबहुल असलेल्या पूर्व भागात टेलर व्यवसायकांच्या (Tailors) (शिवणकाम) दुकानाबाहेर हाऊसफुलचे फलक लागले आहेत. ईदपर्यंत कपडे शिवून मिळावेत, यासाठी नागरिकांची लगबग सुरु आहे. येथील मोठ्या टेलर व्यावसायिकांनी ग्रामीण भागातून शिवणकाम करणारे कारागिर मागविले आहेत. तीन वर्षात प्रथमच टेलर व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.

गेल्या काही वर्षांपासून रेडिमेड कपड्यांमुळे टेलर व्यवसाय अडचणीत आला होता. अजूनही अनेक जण कपडे शिवून घेतात. विशेषत: रमजान ईदसाठी कपडे शिवून घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. युवा पिढीचा रेडिमेड कपड्यांकडे कल वाढला होता. कपड्यांमध्ये नवीन डिझाईन आल्याने युवा वर्गाला ते आकर्षित करीत आहे. त्यामुळे टेलरकडून शर्ट शिवून घेत आहे. यंदा युवा पिढी रेडिमेड पॅन्ट खरेदी करताना दिसत आहे. शहरातील पूर्व भागात गल्ली- मोहल्यात शिवणकाम करणारे एक हजारपेक्षा अधिक व्यावसायिक आहेत. यावर्षी शब-ए-बारात, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हे तिन्ही सण पंधरा दिवस ते एक महिन्याच्या अंतराने आल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कपडे खरेदी केले असून, शिवण्यासाठी व्यावसायिकांकडे गर्दी होत आहे.

tailor shops Housefull in Malegaon Ramzan Eid
पोलिसांची अजब तऱ्हा; ‘आपलं ते पोरगं, दुसऱ्याचं ते कार्टं’| Nashik

रमजान सणासाठी वेळेवर कपडे मिळावेत यासाठी नागरिकांची टेलर व्यावसायिकांकडे धावपळ सुरु आहे. शिवलेले कपडे रेडिमेड कपड्यांपेक्षा चांगल्या दर्जाचे असल्याने युवा बरोबरच जेष्ठ नागरिकांकडूनही पसंती मिळत आहे. इतर शहराच्या तुलनेने येथे कपडे शिवण्याचे दर कमी आहेत. काही नामांकित टेलर व्यावसायिकांकडे मोठ्या शहरांमधून नागरीक कपडे शिवण्यासाठी येत आहेत. शहरात रमजान महिन्यात कपडे शिवण्यासाठी तीन ते चार हजार कारागिर कार्यरत आहेत. कारागिरांनी शिवणयंत्र सज्ज ठेवले आहेत. महिनाभरात एक कारागिर ८० ते ९० ड्रेस शिवतो. मोठ्या टेलर दुकानदारांकडून कारागिरांना एक शर्ट- पॅन्ट शिवण्याचे २०० ते २५० रुपये मजुरी मिळते. रमजान महिन्यात नागरिकांकडून ईदची नमाज पठण करण्यासाठी कुर्ता, पायजमा, पठाणी ड्रेस याला प्राधान्य दिले जाते. चैन, बटन, धागे व इतर साहित्य महागल्याने शिलाईचे दर वाढले आहेत.

tailor shops Housefull in Malegaon Ramzan Eid
बाॅलिवूड हळहळले !.. कशी होती सुब्रमण्यम यांची कारकिर्द..

एका ड्रेसचे वाढलेले दर

२०१९- ३५० रुपये

२०२० - ४०० रुपये

२०२१ - ४५० रुपये

२०२२ - ५५० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com