
बाॅलिवूड हळहळले !.. कशी होती सुब्रमण्यम यांची कारकिर्द..
हिंदी चित्रपटसृष्टीत महत्वाचे योगदान देणारे पटकथाकार आणि अभिनेते शिव सुब्रमण्यम यांचे रविवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. निधनाचे कारण अद्याप कळले नाही. परंतु मनोरंजन विश्वासाठी ही मोठी दुःखद आणि अनपेक्षित बाब ठरली. या बातमी नंतर बॉलीवूडमधील अनेकांना धक्का बसला असून अनेक दिग्गजांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा: Shiv subramaniam : अभिनेते शिव सुब्रमण्यम यांचे निधन, मुलाचेही नुकतेच..
"आमचा प्रिय मित्र शिव एक मोठा नट आणि एक प्रतिभाशाली माणूस होता. त्याच्या निधनाची वार्ता ऐकून अतिशय धक्का बसला. या भीषण दु:खाला तोंड देण्याचे सामर्थ्य परमेश्वर त्याची पत्नी दिव्या हिला देवो."असे ट्विट चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी केले आहे.
हेही वाचा: सारा म्हणतेय 'चलो दिलदार चलो...' तर इब्राहीम...
चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनीही सोशल मीडियावर सुब्रमण्यम यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे."सकाळी दिवस सुरु होताच ही अतिशय वाईट बातमी मिळाली. सुब्रमण्यम गेले. अगदी हुदयद्रावक बातमी." असे ट्विट त्यांनी केले आहे.
हेही वाचा: तोंड लपवून फिरतोय राज कुंद्रा, नेटकरी म्हणाले 'स्वस्तातला डेडपूल'
'मला शिवसोबत पहिल्यांदा 'परिंदा' आणि नंतर '२४' मध्ये काम करण्याची संधी मिळाली. दोन्ही वेळा त्याचा अभिनय थक्क करणारा होता. एक असा उत्कृष्ट अभिनेता ज्याची खरोखरच आठवण येईल. त्याच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे, अशी भावना अभिनेते अनिल कपूर (anil kapoor) यांनी व्यक्त केली आहे.
सुब्रमण्यम यांचा प्रवास...
सुब्रमण्यम यांनी १९८९ मध्ये परिंदा या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी सहाय्यक भूमिका देखील केली आहे. '१९४२ :अ लव्ह स्टोरी', 'इस रात की सुबह नहीं', 'अर्जुन पंडित', 'चमेली', 'हजारों ख्वाईशे ऐसी',आणि 'तीन पत्ती' या चित्रपटांसाठी पटकथा लेखन केले. ते कायमच उत्तम पटकथाकार म्हणून गौरवले गेले.
पटकथा लेखनाव्यतिरिक्त सुब्रमण्यम यांनी चित्रपट आणि टीव्ही शोमधून अभिनयही केला. 'मुक्ती बंधन' या टीव्ही शोमध्ये त्यांनी बड्या उद्योजकाची भूमिका साकारली होती. 'स्टॅनले का डब्बा', 'तू है मेरा संडे'. 'उंगली', 'नेल पॉलिश' आणि 'टू स्टेट्स' या चित्रपटांमधील मधील त्यांनी साकारलेल्या भूमिकांचे विशेष कौतुक केले गेले. 'टू स्टेट्स' मध्ये सुब्रमण्यम यांनी आलिया भटच्या वडिलांची भूमिका केली होती. सुब्रमण्यम यांनी करन जोहरच्या 'मीनाक्षी सुंदरेश्वर' या चित्रपटासाठी केलेले काम अखेरचे ठरले. या चित्रपटात त्यांनी सान्या मल्होत्राच्या आजोबांची भूमिका केली होती.
Web Title: Bollywood Gives Condolence To Shiv Subramaniams
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..