esakal | द्राक्ष उत्पादकांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करा - भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal

द्राक्ष उत्पादकांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करा - भुजबळ

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळवून द्यावेत. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असा आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता.११) नाशिक ग्रामीण पोलिस प्रशासनाला दिले. दिंडोरी, चांदवड, निफाड व त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील फसवणूक झालेल्या द्राक्ष उत्पादकांनी भुजबळ फार्म येथील कार्यालयात भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

भुजबळ यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यास सांगितले. द्राक्ष उत्पादक संतोष आहेर, शरद मालसाने, रघुनाथ पाटील, सुनील शिंदे, त्र्यंबक कडलग, मधुकर मालसाने, हिरामण कदम, दौलत मालसाने आदी उपस्थित होते. श्री. भुजबळ यांना द्राक्ष उत्पादकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की २०२०-२१ हंगामात दिंडोरी, निफाड, चांदवड व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची पाडवा ॲग्रो सोल्युशन या एक्स्पोर्टर कंपनीकडून अडीच कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत विविध पोलिस ठाण्यांमध्ये शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा.

हेही वाचा: मोदी, नाशिक अन् ‘त्या’ दोघी…

फसवणूकदारांना शिक्षेची व्हावी तरतूद

शेतकऱ्यांसाठी नवीन कायदा करण्यात येत आहे. त्या कायद्यात शेतकऱ्यांची निर्यातदार अथवा स्थानिक व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक शिक्षेची तरतूद करण्यात यावी. शिवाय व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळावेत, अशीही तरतूद करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी भुजबळ यांच्याकडे केली.

हेही वाचा: पावसाच्या ओढीमुळे नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट

loading image